ad headr

Powered by Blogger.

भडगावात समाजप्रबोधनपर विनोदी भारूडाचा भव्य कार्यक्रम

भडगाव :दि. 7 प्रतिनिधी...सुभाष ठाकरे...
महाराष्ट्र पत्रकार संघ संचलित  भडगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने तसेच भडगाव यांच्या सहकार्याने भडगाव शहरात समाजप्रबोधनपर विनोदी भारूडाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजातील विविध ज्वलंत प्रश्नांवर विनोदाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
जनजागृती भारूड मंडळ, आळंदी देवाची यांच्याकडून सादर होणाऱ्या या कार्यक्रमात   “विनोदातून समाज प्रबोधन”  ही संकल्पना प्रभावीपणे मांडली जाणार आहे. भारूड सम्राट म्हणून राज्यभरात ख्याती असलेले. गोविंद महाराज गायकवाड आपल्या खास शैलीतील सडेतोड, मिश्कील आणि समाजभान जागवणारे विनोदी भारूड सादर करणार असून, त्यातून सामाजिक वास्तव, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, नैतिक मूल्ये आणि जनजागृतीचा संदेश दिला जाणार आहे.

हा कार्यक्रम  बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता  भडगाव येथील   लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय, पाण्याच्या टाकीसमोर** येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित असून, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची परंपरा जपण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे.

सदर कार्यक्रमाचा लाभ भडगाव शहरासह परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन *महाराष्ट्र पत्रकार संघ, व भडगाव तालुका पत्रकार संघ* भडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments