यशस्वी शस्त्रक्रियेमुळे ५१ वर्षीय रुग्ण कॅन्सरमुक्त कॅन्सर तज्ज्ञांनी उपचाराला दिली दिशा.
जळगाव : वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणार्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ५१ वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार करून त्याला तोंडाच्या कर्करोगातून पूर्णतः मुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. रुग्णाची प्रबळ इच्छाशक्ती, वेळेवर निदान आणि कॅन्सर तज्ज्ञांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे हा उपचार यशस्वी ठरला आहे.
याबाबत माहिती अशी की, नशिराबाद येथील ५१ वर्षीय रुग्णाला गेल्या अनेक वर्षांपासून गुटखा खाण्याची सवय होती. सुमारे तीन वर्षांपूर्वी तोंडाच्या आतील भागात गाठ निर्माण झाल्याचे त्याच्या लक्षात आले. सुरुवातीला किरकोळ समजून दुर्लक्ष केल्यामुळे कालांतराने गाठ वाढत गेली. वेदना, तोंड उघडण्यास अडचण व खाण्यापिण्यात त्रास होऊ लागल्यानंतर अखेर रुग्णाने तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अतुल भारंबे यांच्याकडे तपासणीसाठी धाव घेतली.
रूग्णालयात सखोल तपासण्या
रुग्णालयात स
Post a Comment