🌺 भडगाव येथील श्री वीरेंद्र भांडारकर व TVS मोटार कंपनी कोपरगाव. यांच्या संयुक्त विद्यमाने – शिर्डी साई सेवेला आधुनिक TVS वाहनांची भेट🌺
भडगाव -[ प्रतिनिधी ]. सुभाष ठाकरे.. पवित्र शिर्डी येथे साईभक्ती, सेवाभाव व सामाजिक उत्तरदायित्व यातून. साई टीव्हीएस, कोपरगाव व TVS Motor Company यांच्या संयुक्त विद्यमाने साईबाबांच्या चरणी अपाचे 310 RTX, एन-टॉर्क 150, ऑर्बिटर ईव्ही स्कूटर तसेच ईव्ही थ्री-व्हीलर मालवाहतूक वाहन अशी एकूण चार वाहने श्रद्धेने अर्पण (दान) करण्यात आली.
ही वाहने साईबाबांच्या सेवेसाठी व शिर्डी साईबाबा संस्थानच्या दैनंदिन प्रशासकीय व सेवा कार्यासाठी उपयुक्त ठरणार असून, पर्यावरणपूरक ईव्ही वाहनांमुळे हरित ऊर्जेला चालना मिळणार आहे.
या पवित्र प्रसंगी साई सेवा टीव्हीएस, कोपरगावचे संचालक वीरेंद्र भांडारकर, टीव्हीएस मोटर कंपनीचे प्रीमियम हेड श्री. विमल सुमली सर, तसेच संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. गोरक्ष गाढविलकर साहेब, वाहन विभागाचे श्री. अतुल वाघ, भोसले साहेब, गावडे साहेब टीव्हीएस कंपनीचे गोपाला सर, मोहक द्वार सर आमचे मित्र बाळासाहेब गाडे व शिर्डी साईबाबा संस्थानचे मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत साईबाबांच्या चरणी वाहनदानाचा विधी पार पडला. “साई सेवा म्हणजेच मानव सेवा” या भावनेतून करण्यात आलेले हे दान संस्थानच्या सेवाकार्याला अधिक गती देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी वीरेंद्र भांडारकर यांनी व्यक्त करण्यात आला.
साईबाबा यांच्या कृपाशीर्वादाने हे सेवाकार्य यशस्वी होवो व समाजोपयोगी उपक्रमांना नवी प्रेरणा मिळो, अशी प्रार्थना उपस्थित सर्वांनी केली.
Post a Comment