गिरड येथील गिरणा पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई महसुल व पोलिस पथकावर दगडफेक व हुज्जतबाजी, पाचोरा येथील २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
तालुक्यातील गिरड जवळील गिरणा नदी पात्रातून सर्रास अवैध वाळू उपास करणाऱ्या वाहनांवर कारवाई साठी भडगाव महसूल पथक गेले असता. पथकाशी हुज्जत बाजी करत धमकी दिल्याचा प्रकार घडला. याबाबत माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन दाखल झाल्यावर पोलिसांवर सुद्धा धमकी व दगडफेकीचा प्रयत्न करण्यात आला.हा प्रकार दि.30 रोजी मध्यरात्री घडला याबाबत पाचोरा येथील 20 ते 25 वाळू माफियांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत एक जेसीबी दोन डंपर एक ट्रॅक्टर व एक वाळू काढण्याची किन्ही असा एकूण 37 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गु.र.न.४७८/२०२५
भारतीय न्याय संहिता (बी एन एस),२०२३ कलम १८९(२),१९१(२),१९०,१९२,१३२,३०३(२),१२१,
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६,४८(७)
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६,४८(८)(१) प्रमाणे भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे
Post a Comment