ad headr

Powered by Blogger.

सूक्ष्मजीवशास्त्र विभागामार्फत “कनेक्टिंग मायक्रोब्स: प्रयोगशाळा ते शाळा जोड कार्यक्रमाचे” यशस्वी आयोजन

 जळगाव:  [ प्रतिनिधी ] येथील के.सी.ई. सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागामार्फत व ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने “कनेक्टिंग मायक्रोब्स:प्रयोगशाळा ते शाळा जोड कार्यक्रम” आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमांतर्गत माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना “सूक्ष्मजीव व सूक्ष्मजीवशास्त्राची ओळख” करून देणे, सूक्ष्मजीवशास्त्र शेत्रातील नवनवीन संधींची माहिती देणे
 आणि प्रयोगशाळेला शालेय विद्यार्थ्यांशी जोडणे हा उद्देश ठेऊन व्याख्यान व प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. संगीता चंद्रात्रे यांनी “सूक्ष्मजीवांचे अद्भुत जग आणि तुम्ही” या विषयावर मार्गदर्शन केले. या व्याख्यानात डॉ.चंद्रात्रे यांनी, सूक्ष्मजीव व सूक्ष्मजीवशास्त्र ह्या संकल्पना, सूक्ष्मजीवांचा इतिहास, सूक्ष्म जीवांच्या अद्भुत शक्ती, भारतीय आदी ऋषींनी केलेले संशोधनपर लेखन, सूक्ष्मजीवशास्त्राचे दैनंदिन जीवन व औद्योगिक क्षेत्रात असणारे उपयोग, भविष्यातील विविध संधी इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शाळेतून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विभागातील सर्व प्रयोगशाळा दाखवण्यात आल्या. प्रयोगशाळेच्या भेटीदरम्यान तृतीय वर्ष बी.एस्सी. च्या विद्यार्थ्यांनी जिवंत सूक्ष्मजीव, त्यांचे
 विलगीकरण, रंग, स्वरूप, आकार इत्यादींचे सूक्ष्मदर्शकातून अवलोकन करून दिले,
 विविध प्रयोगांचे व उपकरणांचे सादरीकरण केले. ह्या कार्यक्रमात शाळेतील एकूण ९२ विद्यार्थ्यांनी समन्वयक रोहिणी पाटील व इतर सहाय्यक शिक्षक यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमासाठी ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्यध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. केतन नारखेडे व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.संजय भारंबे यांचे मार्गदर्शन लाभले. अशा पोहोच व विस्तार कार्यक्रमांच्या आयोजनाकरिता मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष से.नि.प्रा.डॉ. अरविंद देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी डॉ. लीना धाके, प्रा.राजेश सगळगिळे, प्रा.प्रसाद निकुमे, डॉ.नयना पाटील, डॉ.अंजली जाधव, प्रा.श्रेया पांडे व सर्व शिक्षेकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

No comments