स्पर्धा परीक्षेत संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक-अडव्हॉकेट चंद्रभान पाटील यांचे प्रतिपादन.
अमळनेर - [ प्रतिनिधी ] येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित करिअर कौन्सिलिंग सेंटर या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा पाचवा दिवस अर्थात, 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 12 दरम्यान एडव्होकेट चंद्रभान पाटील(शिखर अकॅडेमी) यांनी राज्यशास्त्र व चालू घडामोडी या विषयावर विद्यार्थ्यांना मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
चंद्रभान पाटील म्हणाले की,स्पर्धा परीक्षेत संकल्पना समजून घेणे आणि त्या स्पष्ट होणे म्हणजेच परीक्षेत हमखास यश मिळविण्यासारखे आहे म्हणून 2500 संकल्पना आपण नीटपणे समजून घेतले पाहिजे.त्यांनी आपल्या तासभर मार्गदर्शन व्याख्यानात भारतीय राज्यघटना, सामान्य ज्ञान, घटनादुरुस्त्या, बातमीपत्र,महान्यायवादी, महाधिवक्ता, केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय कार्यकारी मंडळ, विधिमंडळ, न्याय मंडळ यासंदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात डॉ.बालाजी कांबळे यांनी दुपारी 12:15 ते 1:30 दरम्यान स्पर्धा परीक्षेत वाणिज्य व बँकिंग या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.डॉ.कांबळे म्हणाले की,स्पर्धा परीक्षेत सातत्य ठेवणे फार आवश्यक आहे, यशस्वी व्हायचे असेल तर सातत्य, उजळणी, दर्जेदार पुस्तकांचे अध्ययन आणि आपणास बी प्लॅन तयार ठेवणे महत्वाचे असते. त्याचबरोबर त्यांनी भारतीय बँकेची रचना,आरबीआयची कार्य, अकाउंटिंग, आयकर तसेच जीएसटी या विषयावर सूक्ष्म पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात पीपीटी द्वारे सखोल चर्चा केली.
प्रस्तुत व्याख्यानास अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला या व्याख्यानास करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, डॉ.डी डी कर्दपवार (चोपडा), डॉ.भुसारे(चोपडा), प्रा.सचिन आवटे, प्रा.आकाश गव्हाणे, प्रा.हिमांशू गोसावी,प्रा.अमोल अहिरे यांच्यासह सीसीएमसी विभागातील अनेक विद्यार्थी सहभागी होते.वक्त्यांचा परिचय डॉ.विजय तुंटे यांनी करून दिला.प्रस्तुत दोन्ही सत्रांचे सूत्रसंचालन व आभार संयोजक प्रा.विजय साळुंखे यांनी मानले.
Post a Comment