महादेव हॉस्पिटल आता 'स्ट्रोक रेडी'; मेंदूघाताच्या रुग्णांना मिळणार साडेचार तासांत जीवनदान!न्यूरोलोजी विभागात अत्याधुनिक सुविधांची उपलब्धता
जळगाव : दि. [ प्रतिनिधी ]..
मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानक खंडित होणे म्हणजेच 'स्ट्रोक' किंवा 'ब्रेन अटॅक' हा आजच्या काळात जीवघेणा ठरत आहे. मात्र, लक्षणे दिसल्यानंतर पहिल्या साडेचार तासांत योग्य उपचार मिळाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. हीच गरज ओळखून महादेव हॉस्पिटलचा न्यूरोलॉजी विभाग आता 'स्ट्रोक रेडी हॉस्पिटल' म्हणून सज्ज झाला आहे.
स्ट्रोक आल्यानंतरचे पहिले ४.५ तास अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात उपचार मिळाल्यास 'थ्रोम्बोलिसिस' (क्लॉट बस्टर इंजेक्शन) द्वारे मेंदूतील रक्ताची गाठ विरघळली जाऊ शकते. यामुळे मेंदूचे कायमस्वरूपी नुकसान टाळता येते आणि रुग्ण अर्धांगवायूपासून वाचू शकतो. महादेव हॉस्पिटलमध्ये २४ तास तज्ञ न्यूरोलॉजिस्ट, अत्याधुनिक सिटी स्कॅन, एमआरआय आणि विशेष स्ट्रोक आयसीयूची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
महादेव हॉस्पिटलमध्ये २४x७ तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्ट आणि प्रशिक्षित स्ट्रोक टीम उपलब्ध आहे. तातडीची रेडिओलॉजी तपासणी, अत्याधुनिक क्लॉट बस्टर इंजेक्शनची उपलब्धता आणि स्ट्रोक पश्चात पुनर्वसनासाठी तज्ञ फिजिओथेरपिस्ट उपलब्ध आहेत.
उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. 'Time is Brain' हे सूत्र लक्षात ठेवून तातडीने प्रतिसाद दिल्यास स्ट्रोकवर मात करणे शक्य आहे. संपर्क व मदतीसाठी महादेव हॉस्पिटल येथे डॉ. आशिक शेख (८९७६००६९७८), प्रा. एन.जी.चौधरी (९३२५१५०००४), डॉ. संस्कृती भिरुड (९५८८४ ७६५९६) यांच्याशी संपर्क करावा.
लक्षणे ओळखा "BE FAST"
स्ट्रोक ओळखण्यासाठी तज्ञांनी 'BE FAST' हा फॉर्म्युला दिला आहे. यामध्ये विविध लक्षणांचा समावेश होतो.
B (Balance): चालताना अचानक संतुलन बिघडणे किंवा चक्कर येणे.
E (Eyes): दृष्टी धूसर होणे किंवा एकाएकी दिसेनासे होणे.
F (Face): चेहरा एका बाजूला वाकडा होणे.
A (Arms): हात किंवा पायात अशक्तपणा येणे, हात वर न उचलता येणे.
S (Speech): बोलताना शब्द अडखळणे किंवा स्पष्ट न बोलता येणे.
T (Time): वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास वेळ न घालवता तातडीने हॉस्पिटल गाठणे.
उशीर झाला तर
• मेंदूच्या पेशींना अपुरा रक्तपुरवठा.
• प्रत्येक मिनिटाला २२ लाख मेंदूच्या पेशी नष्ट होतात.
• कायमचा अपंगत्व येऊ शकतो.
• बोलणे, चालणे, समजणे यावर कायमचा परिणाम.
प्रतिक्रिया
"स्ट्रोक हा वेळेशी असलेला लढा आहे. प्रत्येक मिनिटाला मेंदूच्या २२ लाख पेशी नष्ट होत असतात. त्यामुळे घरगुती उपाय किंवा मालिश करण्यात वेळ न घालवता रुग्णाला तात्काळ स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये आणावे. वेळेत उपचार मिळाले तर ८०% रुग्ण पुन्हा सामान्य आयुष्य जगू शकतात."
— डॉ. कमलेश तायडे (न्यूरोलॉजिस्ट, महादेव हॉस्पिटल)
Post a Comment