१५ डिसेंबरनतर गिरणा कालव्यांना पाणी, युद्धपातळीवर कालवा दुरुस्ती सुरू; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित.
भडगाव:- [ प्रतिनिधी ].सुभाष ठाकरे .येथील गिरणा पाटबंधारे उपविभागाच्या वतीने रब्बी हंगामासाठी पाणी आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून, यामुळे तालुक्यातील ५ ते ६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट पाटबंधारे विभागचे आहे. पहिले पाणी आवर्तन १५ डिसेंबर नतर रोजी सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. ही बाब खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. पाणी सोडण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने उजवा व डावा कालवा तसेच पाटचाऱ्यांच्या स्वच्छता व दुरुस्तीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे. जेसीबीसह यंत्रसामग्रीच्या मदतीने ही कामे वेगाने सुरू आहेत.
गिरणा जामदा डाव्या कालव्यासाठी १०, तर उजव्या कालव्याची दुरुस्ती आणि पाटचाऱ्यांच्या कामांसाठी ४ यंत्रसामग्री (मशीनरी) वापरली जात आहे. शेतकऱ्यांनी अधिक यंत्रसामुग्री वाढवून कामे लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. रब्बी हगामसाठी पाणी आवर्तन मिळणार असल्याने खरीप हगामात अतिवृष्टीमुळे सकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चांगले उत्पन्न मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
रब्बी हंगामासाठी एकूण तीन आवर्तने दिली जाणार आहेत. या पाण्याचा लाभ घेऊन खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई करण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाने तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून या पाणी आवर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
----------------------प्रतिक्रिया----------
गिरणा "डावा व उजवा कालवा आणि पाटचाऱ्यांची स्वच्छता व दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत. रब्बी हंगामासाठी पाण्याचे तीन आवर्तने जाहीर करण्यात आले असून, पहिले आवर्तन १५ डिसेंबर नंतर आवर्तन सोडले जाईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पाण्याचा लाभ घ्यावा."
सुभाष चव्हाण
उपविभागीय अधिकारी
गिरणा पाटबंधारे विभाग, भडगाव
Post a Comment