अमळनेर नगरपरिषदेचा विकास निधी गेला कुठे ? अमळनेर नगरपालिका प्रशासकाचे नाव मोठे लक्षण खोटे..
अमळनेर (प्रतिनिधी). जवळजवळ एक पंचवार्षिक प्रशासकाची देखभाल नगरपालिका प्रशासनावर होती. पोट फुगेपर्यंत चर फुगार झालेले प्रशासक यांनी निवडणूक लागण्याच्या पहिले इथून काढता पाय घेतला , न.पा. प्रशासक
यांनी नगरपालिकेचा विकास निधी कुठे टाकला? आशा खेदजनक भावना नागरिकांमध्ये आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील रस्ता हा सर्वात मोठा व वाहतुकीने गजबजलेला असतो. दोन जिल्ह्यांना जोडणारा अमळनेरचा मुख्य रस्ता असून ,त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे वेढलेली असून गटारीवर कुठलाही प्रकारचा खर्च नाही जणू काही या परिसरात नगरपालिका अस्तित्वातच नाही असे वाटते.
गटारी तुटल्यामुळे मोठमोठाल्या झाल्या आहेत आणि अपघाताला निमंत्रण देत आहेत. पाच पाच फुटाच्या गटारी झाल्या असून त्याला कॉंक्रिटीकरण नाही किंवा गटारी बांधलेल्या अवस्थेत नाहीत. जणू काही प्रशासक नुसते नावाला बसले होते. प्रशासकाची पाच वर्षांपूर्वीची संपत्ती आणि आजची संपत्ती काय वाढली आहे याची चौकशी झाली पाहिजे. कारण नगरपालिकाचा एवढा विकास निधी किंवा बजेट गेला कुठे आणि काम कुठे याचा ताळमेळ बसत नाही. आज पर्यंत आंधळी दळते आणि कुत्रं पीठ खाते अशी अवस्था नगरपालिकेची झाली आहे.
शहरातील मोठ-मोठे लोकप्रतिनिधी नुसती गंमत बघतात की काय, अशी अवस्था नगरपालिकेची झाली आहे. जिल्ह्याचे खासदार ताईसाहेब अमळनेरच्या, माजी मंत्री आणि आमदार भूमिपुत्र दादा यांनी विकासाबद्दल काहीतरी ठोस भूमिका घ्यावी. नाहीतर एखादे खेडे तरी अमळनेर पेक्षा चांगले वाटते. अशी नागरिकांची भावना आहे.
Post a Comment