ad headr

Powered by Blogger.

भडगाव तालुका महाराष्ट्र पत्रकार संघ.अध्यक्षपदी जावेद शेख, तर उपाध्यक्षपदी सुभाष ठाकरे, यांची बिनविरोध निवड..

.                   सुभाष ठाकरे
 भडगाव दि. 7[ प्रतिनिधी ]  शासकीय विश्राम गृह येथे भडगाव तालुका पत्रकार संघाची सालाबादप्रमाणे 6 जानेवारी 2026 पत्रकार दिन साजरा करण्यासंदर्भात रूपरेषा ठरविणे तसेच भडगाव तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी निवड करण्याबाबत विविध विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक संपन्न झाली.
 यावेळी 6 जानेवारी 2026 रोजी पत्रकार दिनानिमित्त होणाऱ्या सकाळ सत्र व सायंकाळ सत्राच्या कार्यक्रमांचे नियोजन पत्रकार संघांचे राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ पाटील, विभागीय कार्यकारिणी अध्यक्ष सुनील पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील, विद्यमान अध्यक्ष नरेंद्र पाटील माजी तालुका अध्यक्ष सागर महाजन याच्या उपास्थितीत पुढील वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी भडगाव तालुका अध्यक्षपदी जावेद शेख सत्तार, कार्यध्यक्षपदी निंबाजी पाटील, उपाध्यक्षपदी सुभाष ठाकरे, चेतन महाजन सचिवपदी लक्ष्मीकांत देसले, सदस्य पदी बापू शार्दूल, पुरुषोत्तम महाजन, शुभम सुराणा, राजीव दीक्षित, मनोज पाटील, विजय महाजन व कायदेशीर सल्लागार पदी Adv.भरत ठाकरे, Adv.नितीन महाजन आदीची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर पुढील कार्यक्रमांचे नियोजन व रूपरेषा यावर चर्चा करून पत्रकार संघाचे वतीने नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments