प्रताप महाविद्यालयात NCC दिन उत्साहात साजरा
अमळनेर : [ प्रतिनिधी ] येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज मध्ये दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी NCC-7 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने NCC दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून चिटणीस प्रा.पराग पाटील उपस्थित होते. डॉ.प्रियंका पाटील (CTO), डॉ.कल्पना पाटील (माजी CTO, NCC) आणि प्रा.भाग्यश्री जाधव (CTO, NCC) या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
प्रस्तुत कार्यक्रमात स्वागत गीत तन्वी पाटील, मयुरी बागुल, दिव्या पाटील आणि दिपाली पाटील यांनी सादर केले. कॅडेट्सनी NCC ची शपथ घेऊन प्रतिज्ञा उच्चारले तसेच NCC गीताचे सामूहिक गायन आणि शिस्तबद्ध परेडद्वारे देशप्रेम आणि अनुशासनाची प्रचिती दिली.
यानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रथम क्रमांक लक्ष्मी पाटील, द्वितीय गायत्री ठाकुर आणि तृतीय मयुरी बागुल यांनी पटकावला. यावेळी NCC कॅडेट्सना रॅंक प्रदान करून सन्मानित करण्यात आले असून SUO पदावर साक्षी अविनाश बडगुजर, JUO पदावर रोशनी मनोहर बाविस्कर, SGT म्हणून नंदिनी पाटील, CPL म्हणून वैभवी विनोद पाटील आणि LCPL म्हणून ऐश्वर्या सतीश पाटील यांना गौरविण्यात आले.
प्राचार्य डॉ.जाधव , प्रा.पराग पाटील, डॉ.कल्पना पाटील मॅडम आणि प्रा. भाग्यश्री जाधव मॅडम यांनी कॅडेट्सना प्रेरणादायी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमासाठी Girls Instructor (GI) रुपाली दायमा यांनी विशेष योगदान दिले.
याप्रसंगी गायत्री ठाकुर आणि राजनंदिनी पाटील यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लक्ष्मी पाटील यांनी मानले आणि वंदे मातरम् या राष्ट्रभावनेने भारलेल्या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.प्रियंका पाटील,प्रा.भाग्यश्री जाधव यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment