नव्या जुन्या पिढीला जोडणारा दुवा हरपला. धर्मेंद्र सोबत भाऊंचा एक अविस्मरणीय क्षण.
चित्रपट सृष्टितील देखणा व तडफदार कलाकार अशी ओळख धर्मेंद्र देओल यांनी तयार केली होती, त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांवर आपली एक वेगळी छाप निर्माण केली होती, त्यांनी आपल्या अभिनयातून अनेकांना मनमुराद आनंद दिला, धर्मेंद्र यांची शोले चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना भारावून टाकणारी होती, शोले सारखा चित्रपट आजही भावतो, अशी निर्मिती क्वचितच होते, असा चित्रपट होणे नाही, त्यांनी एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून ही चांगले काम केले होते
धर्मेंद्र यांनी तब्बल 60 वर्षांच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.
देखणे व्यक्तिमत्त्व, अभिनयाची शैली आणि अॅक्शन भूमिकेमुळे ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक बनले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक सुवर्णयुग गमावले आहे.
,त्यांच्या निधनाने आपणही एक उत्तम कलाकार गमावला याची उणीव नक्कीच भासेल
अशोक भवरलाल जैन
अध्यक्ष,
जैन इरिगेशन सिस्टम लि.
Post a Comment