ad headr

Powered by Blogger.

किशोरींना ‘एचपीव्ही’लस मिळणार मोफत गर्भाशयमुख कर्करोगावर नियंत्र मिळविण्यासाठी मोहीम,

नाशिक – असंतुलित आहार,व स्वच्छतेच्या अभावामुळे गर्भाशयाचा कर्करोग महिलांमध्ये झपाट्याने वाढत असून. बहुसंख्य महिलांमध्ये योग्य काळजी अभावी ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे.( एचपीव्ही ) महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी ‘एचपीव्ही` (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) ही प्रतिबंधात्मक लस आता जिल्ह्यामध्ये मोफत दिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ४० हजारांहून अधिक मुलींना ही लस दिली जाणार आहे.
महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असून लहान मुलींनाही त्याचा विळखा पडत आहे. याअनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १४ ते १५ वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींना एचपीव्ही लस आता मोफत मिळणार आहे. ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे.
महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्यास  हार्मोन्समधील असंतुलन, अस्वच्छता, ताण तणाव, प्रदुषण.ही प्रमुख कारणे ठरतात. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हे या कर्करोगाचे मुख्य कारण आहे. एचपीव्ही लसीकरणामुळे या कर्करोगावर प्रतिबंध घालणे शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर किशोरवयीन मुलींना हा त्रास होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन लसीकरण करण्यात येणार आहे.
महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी राज्य शासनाने हाती घेतलेली ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस लसीकरण मोहीम (एचपीव्ही) लवकरच नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये चार ते पाच हजार रुपयांपर्यंत किंमत असलेली ही लस आता शासनाच्या पुढाकारामुळे १४ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व किशोरवयीन मुलींना मोफत देण्यात येणार आहे. यासाठी शाळांमार्फत सर्वेक्षण सुरू असून, प्रत्येक शाळेतील मुलींची माहिती संकलित केली जात आहे. ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ही लस उपलब्ध होणार आहे.
ही लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. प्रतिबंधात्मक लस वेळेवर घेतल्यास कर्करोगाचा धोका ९९ टक्केपर्यंत कमी होतो. महिलांच्या आरोग्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल असल्याचे जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली. याबाबत आशा, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून यादी तयार करण्यात येत आहे. त्या त्या विद्यार्थींनीकडून लेखी स्वरूपात होकार मिळाल्यानंतर त्यांना लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावण्यात येणार असल्याचे डॉ. नेहते यांनी सांगितले.

No comments