जामनेरच्या नगराध्यक्षपदी सौ. साधनाताई गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड जळगाव भाजप कार्यालय येथे कार्यकर्त्यांचा फटाके फोडून आनंदोस्तव व जल्लोष साजरा.....
जळगाव. [ प्रतिनिधी ]..20/11.
स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर झाल्या असून जळगाव जिल्ह्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी पुन्हा तिसऱ्यांदा नगराध्यक्ष बनण्याचा मान सौ. साधनाताई गिरीश महाजन यांनी मिळवला असून यावेळेस त्या बिनविरोध निवडून आल्या असून आज दि. २० नोव्हेंबर २०२५ गुरूवार रोजी सायंकाळी ५:०० वाजता भाजप कार्यालय जी.एम. फाउंडेशन जळगाव येथे शहराचे लोकप्रिय आ.श्री.सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाके फोडून, पेढे वाटप करून, घोळ ताशांच्या गजरात जल्लोष व आनंद साजरा करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, माजी महापौर भारतीताई सोनवणे, नितीन भाऊ लड्डा, माजी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, राजेंद्र मराठे , राजेंद्र घुगे पाटील, रेखाताई वर्मा, गायत्रीताई राणे, सुरेखाताई तायडे, पितांबर भावसार, दिपक परदेशी, भूषण लाडवंजारी, मनोज भांडारकर, संजय शिंदे, मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, दीपमालाताई काळे, अजित राणे विनोद मराठे, अतुल बारी, गीतांजलीताई ठाकरे, रेखाताई कुलकर्णी, सविता बोरसे भाजपाचे माजी नगरसेवक मंडळ अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment