ad headr

Powered by Blogger.

भडगाव शहरात नगराध्यक्ष पदाकरिता त्रिपक्षीय लढत रंगणार


भडगाव[ प्रतिनिधी ]..सुभाष ठाकरे 
 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये नगराध्यक्ष पदाकरिता यंदा त्रिपक्षीय लढत पाहायला मिळणार असून, यासाठी दाखल झालेल्या उमेदवारांची माघार प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार अंतिम रिंगणात कायम राहिले आहेत. तसेच नगरसेवक पदाकरिता २४ जागांसाठी तब्बल ६८ उमेदवारांचे रिंगण तयार झाले आहे.

 नगराध्यक्ष पदाकरिता त्रिपक्षीय मुकाबला
(अनुसूचित जमाती महिला राखीव) करिता पाटील सुशिला शांताराम (भाजपा), मालचे रेखा प्रदीप (शिवसेना), तडवी सपना निजाम (राकाॅपा)

नगरसेवक पदाकरिता अंतिम रिंगणातील उमेदवार
प्रभाग क्र. १ (अ) अनुसूचित जमाती महिला राखीव करिता मालचे लताबाई अजय (अपक्ष), सोनवणे रंजना रवींद्र (शिवसेना), भिल अंजना हिंम्मत (भाजपा)
प्रभाग क्र. १ (ब) सर्वसाधारण करिता नरवाडे गणेश काशिनाथ (शिवसेना), पाटील जितेंद्र विठ्ठल (भाजपा), पाटील सुशीलाबाई भगवान (अपक्ष),

प्रभाग क्र. २ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग करिता मिनाक्षीबाई नारायण पाटील (भाजपा) शिरसाट महेश राजेंद्र (अपक्ष) देशमुख विजयकुमार नानासाहेब (शिवसेना)
प्रभाग क्र. २ (ब) सर्वसाधारण महिला राखीव करिता पठाण खालेदाबी नसीर खान (भाजपा) वाघ रंजनाबाई अनिल (शिवसेना) मोरे चैताली जगन्नाथ (अपक्ष)

प्रभाग क्र. ३ (अ) सर्वसाधारण महिला राखीव करिता मिर्झा अनजुमपरवीन हकीमबेग (शिवसेना), पठाण बिबाबी अमानुल्लाखान (भाजपा)
प्रभाग क्रमांक ३ (ब) सर्वसाधारण करिता पठाण शेरखान मजिदखान (भाजपा)

प्रभाग क्रमांक ४ (अ) सर्वसाधारण महिला राखीव करिता देशमुख करुणाबाई सुनील (शिवसेना), पवार पुष्पांजली प्रशांत (भाजपा), प्रभाग क्रमांक ४ (ब) सर्वसाधारण करिता ततार महेंद्र वसंत (शिवसेना), चोरडिया सचिन विनोदकुमार (भाजपा) 

प्रभाग क्रमांक ५ (अ) नामाप्र महिला राखीव करिता पाटील कविता सोमनाथ (भाजपा), पाटील किरण अतुल (शिवसेना), 
प्रभाग क्रमांक ५ (ब) सर्वसाधारण करिता पवार जितेंद्र भास्करराव (भाजपा), अतुलसिंह भिकनसिंह परदेशी (शिवसेना)

प्रभाग क्रमांक ६ (अ) नामाप्र महिला राखीव करिता येवले योगिता शशिकांत (शिवसेना), पाटील आशाबाई रंगनाथ (भाजपा)
प्रभाग क्रमांक ६ (ब) सर्वसाधारण करिता पाटील लकीचंद प्रकाश (शिवसेना), पाटील प्रशांत पांडुरंग (भाजपा) 

प्रभाग क्रमांक ७ (अ) नामाप्र महिला राखीव करिता परदेशी नीता गणेश (शिवसेना), सूर्यवंशी दिपाली नरेंद्रसिंग (भाजपा), फकीर नगमाबी अलोमशाह (अपक्ष)
प्रभाग क्रमांक ७ (ब) सर्वसाधारण करिता शेख खलील शेख अजीज (शिवसेना), धोबी भरत किसन (अपक्ष), बेग न्यामतबेग हुकमत (भाजपा), थोरात अमोल सुरेश (शिवसेना उबाठा), खान सलीमाबी शब्बीर (राकाॅपा)

प्रभाग क्रमांक ८ (अ) सर्वसाधारण महिला राखीव करिता पाटील पुनम प्रशांत (भाजपा), पाटील समीक्षा लकीचंद (शिवसेना) 
प्रभाग क्रमांक ८ (ब) सर्वसाधारण पाटील अमोल नाना (भाजपा), पाटील प्रमोद हेमराज (शिवसेना), वाडेकर भूषण प्रकाश (शिवसेना उबाठा)

प्रभाग क्रमांक ९ (अ) नामाप्र करिता महाजन उज्वल अनिल (राकाॅपा), भोसले विजयकुमार (शिवसेना), पाटील शेखर दिनानाथ (भाजपा), 
प्रभाग क्रमांक ९ (ब) सर्वसाधारण महिला राखीव करिता पाटील योजना दत्तात्रय (भाजपा), पाटील वैशाली विशाल (शिवसेना), 

प्रभाग क्रमांक १० (अ) नामाप्र करिता पाटील प्रवीण वसंत (भाजपा), पाटील राजेंद्र महादु (शिवसेना), पाटील विठ्ठल कौतिक (अपक्ष)
प्रभाग क्रमांक १० (ब) सर्वसाधारण महिला राखीव करिता पाटील ज्योती जितेंद्र (शिवसेना), बोरसे कुसुम सुभाष (भाजपा), पाटील हर्षा विठ्ठल (शिवसेना उबाठा), सैय्यद शकीला इब्राहिम (अपक्ष), शेख शहनाजबी अनीस (अपक्ष) 

प्रभाग क्रमांक ११ (अ) अनुसूचित जाती राखीव करिता अहिरे देवाजी बापू (शिवसेना), अहिरे अविनाश पुंडलिक (अपक्ष), अहिरे योगिता कृष्णादास (भाजपा), मोरे सुरेंद्र चंद्रराव (शिवसेना उबाठा)
प्रभाग क्रमांक ११ (ब) सर्वसाधारण महिला राखीव करिता भोई पुष्पाबाई अशोक (अपक्ष) भोई कल्पनाबाई जगन (शिवसेना) वाघ मिनाक्षी संजय (भाजपा) 

प्रभाग क्रमांक १२ (अ) अनुसूचित जमाती करिता सोनवणे रवींद्र शांताराम (भाजपा) ठाकरे राहुल राजेंद्र (शिवसेना), मालचे रितेश राजेश (अपक्ष)
प्रभाग क्रमांक १२ (ब) सर्वसाधारण महिला राखीव करिता महाजन वैशाली संतोष (शिवसेना), अहिरे कमलबाई पुंडलिक (अपक्ष), पठाण रूखसरवी शाहरूखखान (भाजपा), बाविस्कर मनिषा हिरामण (राकाॅपा)

यापूर्वी नगराध्यक्ष तसेच विविध प्रभागातील मोठ्या संख्येने उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. मात्र अनेक उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर अंतिम आकडा स्पष्ट झाला आहे.
शिवसेना शिंदे गट नगराध्यक्ष पदाकरिता एक तर नगरसेवक पदाकरिता २४ उमेदवार भाजपा नगराध्यक्ष पदाकरिता एक तर नगरसेवक पदाकरिता २४ उमेदवार शिवसेना उबाठा गट नगरसेवक पदाकरिता ३ उमेदवार राकाॅपा नगराध्यक्ष पदाकरिता एक तर नगरसेवक पदाकरिता चार उमेदवार अपक्ष नगरसेवक पदाकरिता १३ उमेदवार भडगाव नगर परिषदेच्या राजकीय आखाड्यात एकूण २४ नगरसेवक पदाच्या जागांसाठी ६८ उमेदवारांनी निवडणूक रिंगण गाठल्याने भडगावातील राजकीय वातावरणात चुरस निर्माण झाली आहे.
निवडणुकीचा प्रचार आजपासून आणखी वेग घेणार आहे. प्रत्येक पक्ष आणि अपक्ष उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत.
भडगावच्या नगराध्यक्षपदासाठी कोण मारणार बाजी?
हे पाहण्यासाठी संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता ०३ डिसेंबर च्या निवडणूक निकालाकडे लागले आहे.

No comments