ad headr

Powered by Blogger.

प्रचारात फिरणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई होणार, जिल्हा प्रशासन अलर्टवर


जळगाव –[ प्रतिनिधी].  जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांचे वारे सुरू असताना शिक्षण क्षेत्रात  चिंताजनक बाब समोर आली आहे. काही संस्थाचालकांच्या प्रचारासाठी शाळांना कुलूप लावून शिक्षक प्रचारात रमल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
शाळेत परीक्षा सुरू असताना शिक्षक गायब सध्या जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू आहेत. काही ठिकाणी येत्या काही दिवसांत परीक्षा होणार आहेत. अशा संवेदनशील काळात शिक्षकांनी शाळेऐवजी राजकीय प्रचाराची वाट धरल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. काही शाळांमध्ये शिक्षक गैरहजर असल्याने शाळा बंद असल्याचेही प्रकार उघड झाले आहेत. शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांनी स्वतःच्या किंवा संबंधित उमेदवारांच्या प्रचारासाठी शिक्षकांना वापरल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे पोहोचत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून प्रशासनाने तत्काळ दखल घेतली आहे.शिक्षक गायब : जिल्हाधिकारी आणि CEO यांचा इशारापरिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, “शिक्षकांनी शाळा-कॉलेजमध्ये दांडी मारून निवडणूक प्रचारात सहभागी होणे हा शिस्तभंगाचा गंभीर गुन्हा आहे. अशा शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.”शिक्षक प्रचारात फिरतानाचे फोटो व्हिडिओ द्या, लगेच कारवाई करू..तसेच, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की शाळांमधून गैरहजर राहून प्रचारात फिरणाऱ्या शिक्षकांचे फोटो किंवा व्हिडिओ पुरावा म्हणून पाठवावेत. सत्यता पडताळल्यानंतर संबंधितांवर निलंबन ते सेवा समाप्तीपर्यंतची कठोर कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.या सर्व प्रकारामुळे पालक वर्गामध्ये नाराजी निर्माण झाली आहे. शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्राकडे दुर्लक्ष करून शिक्षकांनी राजकीय प्रचारात गुंतणे गैरजबाबदार असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान कोणी भरून देणार? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. तक्रारींची संख्या वाढत असल्याने शिक्षण विभाग सतर्क झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार निरीक्षक पथके तयार करण्यात आली असून, अचानक तपासणी मोहीम हाती घेण्याची शक्यता आहे. शाळा बंद ठेवणे, वेळेआधी सुट्टी देणे किंवा शिक्षकांची अनुपस्थिती आढळल्यास संबंधित संस्था चालकांवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

No comments