जळगाव शहरात अनेक ठिकाणी शाखा उद्घाटनाचे कार्यक्रम
विकास पुरुष श्री सुरेश दामू भोळे (राजू मामा), जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष श्री दिपक जी सूर्यवंशी तथा भा.ज.पा मंडळ क्रमांक 5 चे अध्यक्ष अतुल भाऊ बारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंप्राळा परिसरात विविध ठिकाणी शाखा उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पिंप्राळा स्टॉप, मरी माता मंदिर, गणपती नगर, मयूर कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, खंडेराव नगर पाण्याची टाकी, भोई वाडा, सोनी नगर, शिंदे नगर व इंद्रनील सोसायटी ह्या ठिकाणी नवनिर्मित शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी जळगाव महानगरचे सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा मोर्चा/आघाडी/प्रकोष्ठ पदाधिकारी, मा. नगरसेवक, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख तसेच सर्व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे – अशी नम्र विनंती करण्यात येते.
दि. 17 नोव्हेंबर 2025, सोमवार,वेळ – दुपारी 4:30 वाजता
ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जवळ, पिंप्राळा मंडल क्र.5 अध्यक्ष : अतुल दिनकर बारी
Post a Comment