ad headr

Powered by Blogger.

भडगावजवळ पिंपरखेड तलावात तीन दिवसांत दोन मृतदेह, घातपाताचा संशय, ग्रामस्थांकडून रास्ता रोको.

भडगाव [प्रतिनिधी]..सुभाष ठाकरे...... 
​भडगाव:- तालुक्यातील पिंपरखेड येथे एकाच तलावात अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने दोन तरुणांचे मृतदेह आढळल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. दुसऱ्या मृतदेहामुळे संतप्त झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी भडगाव-कासोदा रस्त्यावर तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन करत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. चौकशी कामी तीन जणांना पोस्टेला बोलविण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपरखेड येथील पारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या तलावात वाल्मिक संजय हडीगे (वय २७) या तरुणाचा मृतदेह आढळला होता. नातेवाईकांनी तेव्हाही घातपाताचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली होती. ही घटना ताजी असतानाच, रविवार सकाळी याच तलावाच्या पाण्यात नारायण रामदास हडीगे (वय ५२) यांचा मृतदेह तरंगताना ग्रामस्थांना दिसला. एका दिवसाच्या अंतराने गावातील दोन तरुणांचे मृतदेह आढळल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले.
  संतप्त जमावाकडून रास्ता रोको..
​दुसऱ्या मृतदेहामुळे संतप्त झालेल्या नारायण हडीगे यांच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केली. त्यांनी तात्काळ भडगाव-कासोदा रस्त्यावर ठिय्या मांडत सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक बापू रोहम आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. जमाव शांत करण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.
*​पोलिसांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन*
​    यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष एस. डी. खेडकर यांनी मध्यस्थी करत संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांचे म्हणणे पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले. उपअधीक्षक बापू रोहम, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी योग्य आणि कसून तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.
         मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन
मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पथकाने भेट देऊन तपासाला दिशा दिली. तसेच, फॉरेन्सिक पथकानेही तलावाच्या ठिकाणी भेट देत काही संशयास्पद धागेदोरे मिळतात का, याची पाहणी केली. घटनेचा तपास करण्याची प्रक्रिया पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, दोन दिवसांत घडलेल्या या रहस्यमय मृत्यूंच्या घटनेमुळे पिपरखेड येथे तणाव पोलीस बदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पिपरखेड येथे  शातता राखण्याकामी घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोहेका निलेश ब्राम्हणकर, ज्ञानेश्वर पाटील, पोना मनोहर पाटील, मगलसिग गायकवाड, पोहेका प्रविण परदेशी, महेद्र चव्हाण, पचशिला निकम, शमिना पठाण हजर होते.

No comments