ad headr

Powered by Blogger.

भडगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीनची सेटिंग व सीलिंग प्रक्रियेची पाहणी.

            भडगाव 28[ प्रतिनिधी ] नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी दिनांक  28/11/2025 रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री देवदत्त केकाण, निवडणूक निरीक्षक यांनी तालुका क्रीडा संकुल, भडगाव येथे भेट देऊन ईव्हीएम मशीनची सेटिंग व सीलिंग प्रक्रियेची पाहणी केली. सदर प्रक्रियेची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन त्यांनी सुरक्षितता, पारदर्शकता व नियमानुसार कामकाज होत असल्याची खात्री केली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहिसलदार श्रीमती शितल सोलाट आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्रीमती स्वालिहा मालगावे हे उपस्थित होते.
त्यानंतर श्री देवदत्त केकाण यांनी आचारसंहिता पालनाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या फ्लाईंग स्क्वॉड/एसएसटी पथकाची (Static Surveillance Team) देखील भेट घेऊन तपासणी केली. पथकाच्या कर्तव्य बजावणीविषयी आवश्यक सूचना देत त्यांनी निवडणूक प्रामाणिक, पारदर्शक आणि कोणत्याही गैरप्रकाराविना होण्यासाठी कडक दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
निवडणूक निरीक्षक यांनी शहारतील नवे वडधे, यशवंतनगर, पेठ व भडगांव शहरातील मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान केंद्रावरील आवश्यक सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
भडगाव नगर परिषद निवडणूक २०२५ शांततेत व सुव्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून नागरिकांनीही सहकार्य करण्याचे व अधिकाधिक लोकशाही उत्सवात सहभागी होण्याचे श्री देवदत्त केकाण, निवडणूक निरीक्षक यांकडून आवाहन करण्यात आले आहे.

No comments