अंमळनेर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर प्रचारात आघाडीवर ; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
अमळनेर [ प्रतिनिधी ].. नगरपरिषद निवडणुकीत चौकाचौकांत आयोजित केलेल्या छोट्या बैठकीतून ते थेट मतदार संवाद साधत आहेत. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत त्यांचे नाव चर्चेत येत असल्याने त्यांच्या प्रचाराच्या या पद्धतीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यामुळे प्रचारात त्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची लढत अत्यंत चुरशीची होणार हे निश्चित. डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर यांची अधिकृत उमेदवारी शिवसेना (शिंदे गट) तर्फे जाहीर करण्यात आली.
त्यामुळे आधी काहीशी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अधिक चुरशीची बनललेली आहे.डॉ. परिक्षीत बाविस्कर यांचा जन्म अमळनेरच्या कासार गल्लीतील इच्छादेवी चौकात झाला.
टाऊन हॉल येथील नवीन मराठी शाळेत त्यांचे प्राथमिक तर नवोदय विद्यालयात त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले.
हुशार व कार्यक्षम विद्यार्थी म्हणून त्यांची ख्याती होती. पुढील शिक्षण त्यांनी अमळनेरमध्येच पूर्ण केले.त्यांचे वडील कै. श्रीराम बाविस्कर हे अमळनेर येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच काका प्रल्हाद बाविस्कर हे शिक्षक, सामाजिक पुढारी आणि प्रबोधनवादी चळवळीतील अग्रणी होते. समाजातील तळागाळातील लोकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. त्याच सामाजिक भानाचा आणि सेवाभावाचा वारसा डॉ. बाविस्कर यांना लाभला आहे.वैद्यकीय व्यवसायामुळे त्यांनी जळगाव येथे दवाखाना सुरू केला असला, तरी गावाशी त्यांची नाळ कायम घट्ट राहिली. शेकडो रुग्णांची सेवा त्यांनी परवडणाऱ्या उपचारांनी केली. कोरोनाच्या कठीण काळातही त्यांनी अनेक रुग्णांवर जीवाची पर्वा न करता उपचार केले.अमळनेरचा बाविस्कर परिवार हा उच्च शिक्षित,
सामाजिक दायित्व जपणारा आणि प्रामाणिकपणासाठी ओळखला जाणारा परिवार मानला जातो. या घराण्यातील 22 कुटुंबांमधून आलेले डॉ. बाविस्कर हे खऱ्या अर्थाने ‘भूमिपुत्र’ असल्याचे मतदारांमध्ये बोलले जात आहे.गेल्या ३०–३५ वर्षांच्या नगरपरिषद इतिहासात एवढे उच्चशिक्षित व समाजसेवेचा वारसा लाभलेले उमेदवार राजकारणात पुढे आल्याचे क्वचितच दिसते. त्यामुळे सुजाण व सर्वसामान्य मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.सध्या नगरपरिषदेसमोर जाचक कर आकारणी, 24x7 पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, बागांचा अभाव, साफसफाई आदी प्रमुख आव्हाने आहेत. लोकनियुक्त पदामुळे नागरिकांना आपल्या पसंतीचा उमेदवार निवडण्याची संधी मिळाल्याने डॉ. बाविस्कर यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली योग्य नियमावली आखली जात असल्यामुळे डॉ. परिक्षीत बाविस्कर यांचा विजय दृष्टीक्षेपात असल्याचा विश्वास समर्थक व अमळनेरकर जनता करीत आहे.
Post a Comment