ad headr

Powered by Blogger.

संविधानिक मूल्य चिरकाल टिकणारे - डॉ.ललित मोमाया यांचेे प्रतिपादन ● प्रताप कॉलेज मध्ये संविधान दिन साजरा● सीसीएमसी, राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांचा संयुक्त उपक्रम● डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व २६/११ रोजी शहीद झालेल्यांच्या प्रतिमांना माल्यार्पण

अमळनेर -[ प्रतिनिधी ]..येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राज्यशास्त्र विभाग,करिअर कौन्सिलिंग सेंटर व राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते १२ दरम्यान सीसीएमसी हॉल याठिकाणी 'संविधान दिन' मोठया उत्साहात संपन्न झाले.
यावेळी विचारमंचावर डॉ.एल एल मोमाया,डॉ.जे बी पटवर्धन, डॉ.एस वाय सोनवणे,डॉ.एच डी जाधव,डॉ.व्ही एस तुंटे उपस्थित होते.
प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि २६/११ रोजी शहीद झालेल्या जवानांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उद्देशपत्रिका व संविधान ग्रंथाचे सुद्धा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
.       याप्रसंगी संविधानाचे प्रवेशद्वार म्हणजे उद्देशपत्रिका अथवा सरणामा यांचे सामूहिक वाचन डॉ.सुनिल राजपूत यांनी केले आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्साहपूर्वक त्यास प्रतिसाद दिला.
    डॉ.ललित मोमाया यांनी मार्गदर्शनपर मनोगतात म्हटले की, संविधान नसते तर अराजकता माजले असते.
संविधानिक मूल्य हे समाजपयोगी असून ते प्रत्येकांना जोडणारे आहेत म्हणून भारतीय संविधान हे एकता व अखंडतेच्या दृष्टीने चिरकाल टिकणारे आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, संविधानामुळे आपण सर्वजण सुरक्षित आहोत,आपणाला हक्कासह कर्तव्याची जाणीव व्हावी याचप्रमाणे जवाबदारीचे भान सुद्धा असणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.
    प्रस्तुत कार्यक्रम प्रसंगी सिनेट सदस्य डॉ धिरज वैष्णव, डॉ.अमित पाटील, डॉ.निलेश चित्ते, ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.धनंजय चौधरी, डॉ.तुषार रजाळे,डॉ.अशोक पाटील,डॉ.ज्ञानेश्वर मराठे,डॉ.रमेश माने,डॉ.किरण सुर्यवंशी, डॉ.अनिल झळके,डॉ.रामदास सुरळकर, क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील, डॉ.विलास गावित, डॉ.रवी बाळसकर,
डॉ.रविंद्र मराठे,डॉ.हर्ष नेतकर,प्रा.दिलीप तडवी आदी उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.राखी घरटे,प्रा.हिमांशू गोसावी,प्रा.अमोल अहिरे,पराग रविंद्र पाटील,अतुल धनगर,विशाल अहिरे,नंदू पाटील,धिरज चौधरी, दितेश चिंचोरे,गिरीश पाटील,विशाल पाटील,योगेश चिंचोरे,सुमित चौधरी, गोपाळ पाटील आदींनी सहकार्य केले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची जवाबदारी तसेच आभार करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी मानले

No comments