ad headr

Powered by Blogger.

भडगाव शहरात भव्य खंडेराव महाराज यात्रा उत्सव ,

भडगाव. [ प्रतिनिधी ]. सुभाष ठाकरे, ,,, शहरात सालाबादप्रमाणे या वर्षीही खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले तरी ही यात्रा भडगाव नगरीत बाजार पेठेत ( आझाद चौक) 
 येथे प्राचीन मंदिर श्री खंडेराव महाराज व मातोश्री बनाइ माता काकन सह हलदिचा अंगाने एक रात्रभर भडगाव येथे मुक्कामाला राहिले होते त्या जागेवर प्राचीन खंडेराव महाराजाचे मंदिर आहे,
 दर वर्षी खंडोबा महाराजांची यात्रा उत्सव साजरा केला जातो. दि. 26 नोव्हेंबर 2025 बुधवार रोजी सकाळी 7 वाजता अभिषेक, देवपूजेचा कार्यक्रम होईल व रात्री 8 वाजता श्री तुषार थोरात यांचा गोंधळाचा दणदणीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून महाप्रसाद दुपारी 12 ते 4 ( भरीत व भाकरी) बाजार चौक, या यात्रेला अनमोल सहकार्य नवनाथ भजनी मंडळ पेठ,हार्मोनियम वादक श्री भावराव अर्जुन माळी पोहरेकर, तबला वादक श्री राजू मिस्तरी.
तरी भडगाव तालुक्यातील सर्व व भडगाव शहरातील सर्व भाविक बंधू भगिनी या कुलदैवत खंडोबारायाची यात्रा महोत्सव सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्याव असे खंडेराव महाराज पंचकमिटी भडगाव यांनी कळविले आहे. या मंदिराचे सेवे करी म्हणून श्री संदीप परदेशी आहेत.

No comments