ad headr

Powered by Blogger.

🛑मांडळच्या पांजरा नदीचे होते वस्त्रहरण..रेती माफिया मुळे होते अधिकाऱ्यांचे लक्ष्मी दर्शन. 🛑

अमळनेर( प्रतिनिधी)तालुक्यातील मांडळ गावा शेजारी पांजरा  नदी वाहते अमळनेर तालुक्यातील व पंचक्रोशीतील अनेक रेतीमाफी रेती उत्खननासाठी नदीत उतरतात आणि रात्रंदिवस ट्रॅक्टर व डंपरच्या साह्याने नदीचे वस्त्रहरण करतात रेती  उपस्यामुळे  अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रेती उपशास बंदी असल्यामुळे तो व्यवसाय अनधिकृत व बेकायदेशीर मानला जातो तहसीलदार व प्रांताच्या तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या हद्दीतील ,जबाबदारीतील व अधिकारातील असल्यामुळे त्यांचा यादी अभय आहे असे सिद्ध होते. माझे अमळनेर तालुक्यातील जनता प्रशासन काहीही वाकडे करू शकत नाही यावीर्भावात प्रशासनातील अधिकारी मंगरूर व आडदांड झाले आहेत. 
रेती ची ट्रॅक्टरे व डंपरे रात्रंदिवस रेती उत्खनन करत असताना सुद्धा कोणाच्या राजाश्रयात हे धंदे चालू आहेत हे जनतेला चांगले माहिती आहे. रेती लुटीचा हा नंगानाच जनता सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया जन मानसात उमटत आहे. आता पुढील अंकात ट्रॅक्टर डंपर मालकाचे नावा सहित यादी प्रसिद्ध होणार आहे याची नोंद घ्यावी.

No comments