सुरा-णा झाले बुरा-णा जितू पंटर भरतो काहींचा किरा-णा.. अमळनेर मध्ये रेती भ्रष्टाचाराचा खेळ सुरू पुरा-णा...
अमळनेर [ प्रतिनिधी ].तालुक्यातील मांडळच्या पांजरा नदीतील रेतीचा धंदा अर्थात काळा धंदा अत्यंत जोमाने सुरू आहे. दररोज ते 50 ट्रॅक्टर आणि नऊ ते दहा डंपर अविरतपणे रेती उत्खननाचे काम सुरू असते. माध्यमांमध्ये पुन्हा पुन्हा बातम्या येतात परंतु मगरूर अधिकारी आमचं कुणी काहीच बिघडवू शकत नाही या अविर्भावात आणि..
"मी नाही त्यातली कडी लावा आतली"
या म्हणी प्रमाणे अत्यंत सोज्वळ, सालस ,शांत, संयमी ,पणाचा आव आणून एखाद्या न्यायाधीशाला लाजवेल असा दरबार उघडून बसले आहेत. माध्यमे आणि लोकप्रतिनच्या " हाताला घडी आणि तोंडाला कुलूप" लागले आहे. त्यांच्या चुप्पी मागले रहस्य न उलगडण्या इतके दूध खुडे अंमळनेर ची जनता नाहीच . नदी दुथडी भरून वाहते आहे तरी कशी हजारो ब्रास रेती मोठमोठ्या ढीगाऱ्यांच्या रूपाने साठवून ठेवलेली आहेत, ते सुद्धा संबंधितांच्या मदतीने. अनेक ट्रॅक्टर चालक मालक यांना रेतीचा धंदा करू द्यायचा की नाही ते सर्वस्वी अधिकाऱ्यांच्या आणि हप्ते खोरांच्या पाकिटांवर अवलंबून आहे. बघा जमते का साहेबजी, अन्यथा उचल बांगडी निश्चित आहे फक्त ऊचल बांगडी होण्याअगोदर स्वैराचाराने आणि बेधुंद वागू नका नाहीतर पंटरा - सहित रुबाबदार नोकरी हातातून जाईल याचे भान असू द्या. अशी अंमळनेर करांमध्ये कुजबूज जोरात रंगते आहे.
Post a Comment