नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवारअलकाताई पवार यांना अमळनेर मधील मतदारांचा वाढता प्रतिसाद..
अमळनेर (प्रतिनिधी) दिनांक . 30/ 10/ 2025 अनुसूचित जमाती नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार सौ अलकाताई उत्कर्ष पवार यांना जनतेचा व शहरातील मतदार बंधू भगिनींचा वाढता प्रतिसाद दिसून येत आहे. मतदारांच्या भेटीगाठी दरम्यान उस्फुर्त आणि उत्साही पद्धतीने मतदारांनी व नागरिकांनी अलकाताई पवार यांचा ठिकठिकाणी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भूमिपुत्र आमदार यांच्या आमदारकी प्रचारादरम्यान तसेच गेल्या दहा वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या अलकाताई पवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
अमळनेर शहरासाठी नगराध्यक्ष म्हणून सोज्वळ, तात्विक, उच्चशिक्षित आणि मनमिळावू, समस्यांची जाण असलेल्या तसेच अंमळनेर शहरासाठी शहराचा सर्वांगीण विकास व दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व म्हणून ताईंना प्रतिसाद मिळत आहे त्या अनुषंगाने काहींच्या " "भूवया" आश्चर्याने उंचावल्या आहेत. तर काही प्रतिस्पर्ध्यांनी तिकीट मागण्यासाठी निरुत्साह दाखवला आहे.
Post a Comment