ad headr

Powered by Blogger.

शेतकरी, बेरोजगार युवा, पिडीत महिलांसोबत संवाद साधण्यासाठी सुसंवाद पदयात्रा - गांधी प्रचारक संदीप घोरपडे.

     
                                                                                अमळनेर [ प्रतिनिधी ] - कामतवाडी ते कपिलेश्वर सुसंवाद पदयात्रा दि. 21 ते 24 ऑक्टोबर 2025  हम चलेंगे हाथों मे लेकर हाथ, अपनोंसे होंगी सपनोंकी बात .. अमळनेरतालुका परिसरातील विविध अडचणी समस्या तसेच अनेक कामातील अडथळे समजून घेण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते पायपीट करत आपल्यापर्यंत पोहोचत आहेत.
 तरुणांना भेटून त्यांच्या रोजगार प्रश्नांवर बोलते करणार आहेत. महिलांना आपल्या आरक्षण, सुरक्षितेवर कुठेतरी न्याय मिळावा, शेतकरी बांधवांच्या आस्मानी-सुलतानी संकटावर मात करण्यासाठी *प्रार्थना सभेच्या आयोजनातून* विविध उपाय, आपापसात संवाद करून सोडवण्याचा मार्ग पदयात्रेत शोधणार आहेत.जनसामान्यांचे प्रश्नं म्हणजे जनतेची लूट प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अनेक कंपन्यांना अनुदान,कर्जमाफी 25 लाख कोटी मागील आकर्षक कंपन्यांचे कर्जमाफी 60 लाख कोटी शेतकरी बजेट खर्च 2.9% मागील सहा वर्षांत शेती बजेटमध्ये 25 % कपात मागे तीन वर्षात 48 % कपात कधी बी -बियाणे कीटकनाशके महागली शेतकरी आत्महत्या तरुणांची बेरोजगारी देशातील 60 ते 70 % गोर-गरीब जनता जीवन जगत आहेत. भारतातील27 कोटी लोक बेरोजगार आहेत. 60 ते 80 लाख सरकारी नोकऱ्या मिळतील आणि तरुणांना रोगार उपलब्ध होईल परंतु कंत्राटी कामगारांना आणून सरकार कामकाज करत आहे. महिलांसाठी अनेक कार्य करूनही लैंगिक शोषण, मणिपूर मध्ये महिलांचे नग्न दिंड करणाऱ्यांची साधी चौकशी झाली नाही, महिलांच्या आब्रु रक्षणासाठी मात्र कोणतेही ठोस पाऊल उचलत नाहीत .सध्या भारतात माध्यमे विकत घेऊन, संविधानिक संस्थावर हल्ला करून, जनसामान्यांची मते नाकारून गरिबांना अधिक गरीब,व श्रीमंतांना श्रीमंत करणारे सरकार कुचकामी आहे.यासाठी शेतकरी, युवावर्ग, महिलांसोबत संवाद साधण्यासाठी सुसंवाद यात्रेत सामील व्हा असे कळकळीचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई वाघ तालुका काँग्रेस अध्यक्ष बी.के. सूर्यवंशी, बन्सीलाल भागवत अण्णा, गजेंद्र साळुंखे,महेश पाटील,*गांधी प्रचारक पदयात्री संदीप घोरपडे* सरचिटणीस जळगाव जिल्हा काँग्रेस पक्ष यांच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments