ad headr

Powered by Blogger.

विर जवानांच्या मरणाचे मातम (दुःख)नाही; तर त्यांचे स्मरण उत्सव साजरे केले जातात ! - पोलिस विनोद अहिरे (२१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन विशेष)

.    जळगाव.  [ प्रतिनिधी ]..20/10
आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आतापर्यंत हजारो पोलिसांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्याच  शहिदांना नमन करण्यासाठी २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभरा  मध्ये 'पोलीस हुतात्मा' दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मी साजरा यासाठी म्हणत आहे की, आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ  जो आपल्या प्राणांची आहुती देतो, त्याच्या मरणाचे 'मातम' (दुःख) न  मनवता त्या शहिदांचे 'स्मरण उत्सव' साजरे करण्यात येतात.
 म्हणूनच एका शायरने असे म्हटले आहे की,

 *शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले*...
 *वतन पर मर मिटनेवालो  तुम्हारा यही निशा होगा* ...

२१ ऑक्टोबर १९५९ रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलातील पोलीस सब-इन्स्पेक्टर किरणसिंग यांच्या नेतृत्वात लडाख हद्दीत बर्फाच्छादित १६ हजार फूट उंचीवर  असलेल्या  हॉटस्प्रिंग या  अत्यंत निर्जन स्थळी रक्त गोठवणाऱ्या थंडीत आपले जवान  गस्त घालीत असताना, अचानक चिनी सैनिकांनी भ्याड हल्ला केला त्यात भारत मातेच्या १० जवानांना वीरमरण आले. आपले कर्तव्य बजावत असताना  जवानांनी अतिशय शौर्याने शत्रू विरोधात लढा देऊन शेवटी मृत्यूला अलिंगन दिले, या जवानांच्या हुतात्म्यांचे स्मरण म्हणून आजही दरवर्षी २१ ऑक्टोबरला देशभरातून प्रत्येक प्रांताचे प्रतिनिधित्व करणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जाते.
  यामध्ये देशातील आंतरिक सुरक्षा करीत असताना आतंकी हल्ल्यात, नक्षलवादी कारवाई करीत असताना तसेच  समाजकंटकांकडून झालेल्या हिंसक कृत्य  रोखताना आपल्या मायभूमिसाठी वर्षभरामध्ये जे पोलीस जवान जवान शहीद होतात त्यांची २१ ऑक्टोबर या दिवशी जिल्ह्यातील पोलिस मुख्यालयात, शहीद स्तंभासमोर 'स्मरण सोहळ्याचे'  पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले जाते, मान्यवरांच्या हस्ते शहीद स्मृती स्तंभाला  पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांचा सन्मान केला जातो.  त्याच बरोबर 'शोकशस्त्र' करून वर्षभरामध्ये जे पोलीस जवान शहीद झालेले आहे, त्यांच्या नावाचे वाचन केले जाते. पोलीस तुकडी कडून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहिदांना सलामी दिली जाते.
 त्यातून उपस्थित पोलीस अधिकारी- कर्मचारी, मान्यवर नागरिक यांना प्रेरणा मिळत असते. उपस्थित नागरिकांना हे देखील समजते की, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा यज्ञकुंड आपल्या पोलिस बांधवांकडून अखंडपणे धगधगता ठेवला जातो म्हणूनच आपण घरामध्ये रात्री शांत झोपू शकतो; परंतु तो सुरक्षेचा यज्ञकुंड सहजासहजी पेटत नाही; तर अनेक विरांच्या देहाचे दान घेत असतो.त्यामध्ये आपल्या वीर जवानांचे रक्ताचे आणि हाडांची समिधा वाहिली जाते; म्हणूनच सुरक्षेचा हा अंतरीक यज्ञकुंड अखंडपणे धगधगत असतो.

 आणि "त्यातून निघालेल्या अग्निज्वाळेतून कसाब सारखे आतंकवादी, समाजकंटक, देशद्रोही राख होत असतात."

*शृंगार से पहले मैं अंगार  लिखता हू*
*इश्क से पहिले मैं इन्कलाब दिखता हू* 
*कोई पुछे अगर मेरी मोहब्बत का नाम क्या है*
 *तो मेरे खुनोकलमसे मैं  मेरी भारत माता का नाम लिखता हू*

 जय हिंद जय महाराष्ट्र 
पो.ना. विनोद पितांबर अहिरे
९८२३१३६३९९
लेखक जळगाव जिल्हा पोलीस दलातील साहित्यिक/कवी आहेत.

No comments