ad headr

Powered by Blogger.

सौंदर्या पटेलचे राज्यस्तरीय आंतर विभागीय भालाफेकस्पर्धेत यश

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आयोजित राज्यस्तरीय आंतर विभागीय क्रीडा चाचणी स्पर्धा २०२५ मध्ये गोदावरी नर्सिंग कॉलेज, जळगावची सौंदर्या पाटेल हिने उत्कृष्ट कामगिरी करत भालाफेक स्पर्धेत प्रथ’ क्र मांक मिळवत यश प्राप्त केले आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशीफ,विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. सौंदर्या पाटेलच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील,सदस्या डॉ. केतकी पाटील,डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील, प्राचार्य डॉ. विशाखा गणवीर, तसेच उपप्राचार्य जसिंत दया, स्पोर्ट्स मार्गदर्शक अभिजीत राठोड यांनी अभिनंदन केले.

No comments