ad headr

Powered by Blogger.

स्तनाच्या कर्करोगावरील जनजागृती वेबिनार

जळगाव —[ प्रतिनिधी ].. येथिल गोदावरी नर्सिंग कॉलेजच्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागात स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी एक माहितीपूर्ण वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
या वेबिनारसाठी कस्तुरबा नर्सिंग कॉलेजच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. आरती वासनिक या मुख्य वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.
डॉ. वासनिक यांनी महिलांच्या आरोग्यविषयी सखोल माहिती देत, जगभरातील महिलांच्या जीवनाशी निगडित असलेल्या स्तनाच्या कर्करोगाविषयी महत्त्वपूर्ण मुद्दे स्पष्ट केले. त्यांनी या आजाराची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि लवकर निदानाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी वेबिनारमूळे उपस्थितांना स्तनाच्या कर्करोगाविषयी योग्य माहिती मिळाली आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढीस लागली.

No comments