अनुभूती विद्यानिकेतनमध्ये 'दिवाळी मेळावा’मध्ये चिमुकल्यांचे उद्योजकीय दर्शन. विद्यार्थ्यांकडून खाद्यपदार्थ, हस्तकला, आर्ट अॅण्ड क्राफ्ट च्या 21 स्टॉल्सव्दारे कलागुणांचे सादरीकरण*
जळगाव, दि. 12 (प्रतिनिधी) - अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘दिवाळी मेळा 2025’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. यात चिमुकल्यांनी विविध स्टॉल्स व्दारे उद्योजकीय दर्शन घडविले.
दिवाळी मेळ्यात मॉन्टेसरी आणि इयत्ता 1 चे विद्यार्थांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ, कला आणि हस्तकला उत्पादने, ग्रीटिंग कार्ड सह अन्य असे क्राऊन कॉर्नर, टेनी टेन्ट, सिंधी प्राऊड, आर दिवाळी किट, फ्रुटि ज्युस, वी-क्री फन अ मैना, क्राफ्ट कॉर्नर, क्युट कॉर्नर अशा 21 स्टॉल्स सादर केले. या उपक्रमातुन मुलांमध्ये वित्तीय साक्षरता, सर्जनशीलता आणि उद्यमशील विचारसरणीला प्रोत्साहन मिळाले.
दीपप्रज्वलनाव्दारे दिवाळी मेळाचे उदघाटन झाले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनिल कांकरिया, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ.निशा जैन, अंबिका जैन, प्राचार्य मनोज परमार यांची उपस्थिती होती. यावेळी जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, सौ. शोभना जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, डॉ. भावना जैन, अथांग जैन, अभंग जैन आणि जैन कुटुंबियांची उपस्थिती होते. सोबत पालक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. सुरवातीला गुरुवंदना व नवकार मंत्र विद्यार्थांनी म्हटला. त्यानंतर प्रेरणादायी नृत्य सादर करून चिमुकल्यांचनी मने जिंकले.
'दिवाळी मेळा' साठी सर्व तयारी आणि व्यवस्थापनात विद्यार्थांना पालकांची साथ होती. 'लकी ड्रॉ' मधील विजेत्यांना शोभना जैन यांच्याहस्ते पारितोषिक दिले.
मुलांना विविध कौशल्य आत्मसात करता यावे? या उद्देशाने या दिवाळी मेळाचे आयोजन केले होते. यामुळे मुलांना योजना बनवणे, पॅकेजिंग करणे, विक्री करणे, ग्राहकांशी संवाद साधणे यासारख्या व्यावहारिक गोष्टी शिकता आल्यात. प्रत्येक स्टॉलसाठी स्वतःचा ब्रँड नाव आणि लोगो हे विद्यार्थांनी केले होते. या उपक्रमामुळे मुलांमध्ये वित्तीय साक्षरता, सर्जनशीलता आणि उद्यमशील विचारसरणीला विकसित होण्यास मदत झाली. तसेच मुलांमध्ये सहकार्य, जबाबदारी आणि आत्मविश्वास वाढला.
Post a Comment