कंत्राटी बाह्य कामगार अर्थात झिरो वायरमन यांची सुरक्षा ऐरणीवर
अमळनेर [ प्रतिनिधी ]..येथील झिरो वायरमन अर्थात कंत्राटी अर्धशिक्षित बाह्य कामगार यांच्या जीविताची सुरक्षा कोणाच्या भरवशावर सुरू आहे ?हा यक्ष प्रश्न असून झिरो वायरमन यांचे विद्युत खांब किंवा विद्युत जनित्राला चिटकून अनेक अपघात प्रसंगी मृत्यू सुद्धा ओढवन्याच्या घटना सर्वश्रुत आहेत. तरीसुद्धा महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण विभागाचे जबाबदार अधिकारी गेंड्याची कातडी ओढून स्तब्ध झोपले आहेत. यांना कोणाचाही धाक उरलेला नाही. कायमस्वरूपी लागलेले वायरमन, लाईनमन यांच्या शारीरिक स्थूलतेमुळे, कार्यक्षमता संपली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक वायरमन किंवा चार-पाच वायरमन मिळून एक ,गरीब होत- करू अत्यंत फाटका अंकुशल कंत्राटी कर्मचारी यांनी लावलेला असतो. त्याच्याकडून मेहनतीचे कामे करून घेणे अर्थात विद्युत खांबावर चढणे, विद्युत रोहि त्रावर चढणे, खाजगी गिऱ्हाईकाचे विद्युत पोल वर चढून कार्बन काढणे, वायर बदलविणे असे जोखमीचे कामे त्या बिचार्या झिरो वायरमन कडून करून घेतात. आणि त्याला अत्यल्प मोबदला देतात. आणि कायमस्वरूपी वायरमन मात्र थाटात वाहनांवर फिरतात. नागरिकांवर दांडगाई करतात. वायर बदलविण्यासाठी पैसे लागतील असे सांगून झिरो वायरमन च्या नावावर ऑनलाईन पैसे मागवणे, गिऱ्हाईकाची लुबाळणूक करणे ,या कामासाठी झिरो वायरमन चा सर्रास वापर होतो. आशा एक ना अनेक तक्रारी अमळनेर तालुका भरातून व शहरातून दाखल आहेत. परंतु जबाबदार अधिकाऱ्यांना त्याचे काही घेणे देणे नाही. वेळेवर झाडांच्या फांद्या छाटणी नाही, वायरलिकेजेचचे काढणे नाही, आणि पावसाळ्यात दररोज वीज बंद होऊन नागरिकांची गैर सोय होणे .याबाबतीत एम. एस. ई. बी. चे अधिकारी अभियंते, उप अभियंते ग्रामीण आणि शहर अत्यंत उदासीन आहेत. परवा जळोद येथे झालेला झिरो वायरमन चा अपघात हा डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रकार आहे. कंत्राटी कामगार काम करत असताना विद्युत प्रवाह सुरू होणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळ असून, तडफडणाऱ्या मुलाचे जीव जागृत दीपक पाटील मुळे वाचले असून आजही तो झिरो वायरमन एका खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. याची खंत वाटली पाहिजे असा सूर नागरिकांतून येत आहे जे जे कंत्राटी वायरमन, लाईनमन आहेत त्यांच्या सुरक्षेबद्दल नागरिकांचा रोष अधिकाऱ्यांवर आहे. त्या अर्धशिक्षित माणसाला कामावर कोणी ठेवले ?कोणत्या वायरमनचा तो झोन आहे ?त्याला तडकाफडकी निलंबित करून या झिरो वायरमेनच्या अपघातास जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे.
Post a Comment