ad headr

Powered by Blogger.

बोरी नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

 अमळनेर.    [ प्रतिनिधी ]
 गेल्या दोन दिवसात बोरी मध्यम प्रकल्पात रात्री उशिरा पर्यंत  येणाऱ्या पाण्याची आवक पाहता 95 टक्के जिवंत साठा  आहे. पावसाचा अंदाज पाहता धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारा पाण्याचा येवा बघता धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन आज  बोरी धरणातून जास्तीचे पुराचे पाणी  
 सांडव्याद्वारे खाली बोरी नदीत सोडण्याची शक्यता आहे, तरी नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे, कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, पुराचा प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवा प्रमाणे कमी जास्त करण्यात येईल.साधारणतः धरणातून करण्यात येणारा विसर्ग हा सुरवातीला 900 क्यूसेक इतका राहील व तदनंतर पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवानुसार विसर्ग वेळो वेळी कमी जास्त होऊ शकतो ,तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी ही असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments