स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत स्वच्छता पंधरवडा सुरू. अमळनेर नगरपालिका हद्दीत 5.5 टन कचरा गोळा
अमळनेर. [ प्रतिनिधी ]..
स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA) , भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवडा* अंतर्गत स्वछता ही सेवा* अभियान अंतर्गत आज दि.१७/०९/२०२५ रोजी कार्यालय नगर परिषद अमळनेर
येथील आयुडीपी शॉपिंग कॉम्प्लेक्स, पु. साने गुरुजी पुतळा परिसर तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्स छत, बस स्टेशन परिसर , बालेमिया परिसर मुख्य रस्ता, धुळे रस्ता, पिंपळे रस्ता, ढेकू रस्ता ईत्यादी भागात संपूर्ण स्वच्छता /साफसफाई करून एकूण ५.५ टन कचरा काढण्यात आला. सदर अभियान अमळनेर नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. तसेच अभियान अंमलबजावणी प्रसंगी अमळनेर नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी तुषार नेरकर, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे, स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक, १ ते १७ प्रभागातील मुकादम, शहर समन्वयक गणेश गढरी, प्रभागातील सफाई कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
स्वच्छता हि सेवा अभियान दिनांक १७ सप्टेबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राबविले जाणार असून अमळनेर शहरातील सर्व नागरिक, आस्थापना, शासकीय -निमशासकीय कार्यालय, शाळा, खाजगी/सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, मा. नगरसेवक, पत्रकार संघ, ई. सर्वांनी सदर अभियानाची प्रभावीपणे अमलबजावणी करणे कामी अभियानात स्वयस्फुर्तीने सहभागी होवून अमळनेर शहर स्वच्ह, सुंदर व हरित करण्यात आपला अमूल्य सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
Post a Comment