भडगावात संत शिरोमणी सेना महाराजांना अभिवादन; शहरातील प्रमुख मार्गांवरून पालखी मिरवणूक
भडगाव:-[ प्रतिनिधी ]. सुभाष ठाकरे. |येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहराच्या प्रमुख मार्गांवरून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली, ज्याची सांगता विठ्ठल-रुक्मिणी, श्री. संत सेना महाराज मंदिरात महाआरतीने झाली.
महाआरती मंडळाचे अध्यक्ष संजय पवार (पत्रकार) आणि निवृत्त पोलीस निरीक्षक संभाजी वेळीस्कर यांच्या हस्ते पार पडला. यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाचे प्रायोजकत्व संभाजी वेळीस्कर यांनी स्वीकारले होते.
पालखी मिरवणुकीत माजी नगरसेवक डॉ. विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवका योजना पाटील, डी. डी. पाटील, चर्मकार संघाचे अध्यक्ष रविंद्र अहिरे, पत्रकार शिवदास महाजन, सागर महाजन, ग्यानबा यांच्यासह अनेक मान्यवरांनी महाराजांचे दर्शन घेतले. तसेच, कार्यक्रमस्थळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र लाडे, भाजपचे अमोल शिंदे, युवा सेनेचे लखीचंद पाटील, महेंद्र ततार, निलेश पाटील, माजी नगराध्यक्ष राजेद्र पाटील, अमोल महाजन, अर्जुन बाग यांनी भेट देऊन महाराजांना वंदन केले. यावेळी वर्षभर मंडळाला विविध भुमिकेतुन सहकार्य करणाऱ्या नगरपरिषद कर्मचारी नितीन पाटील, छोटु वैद्य, सुनिल पवार, किशोर पाटील आणि शिवाजी शिरसाठ यांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष रविंद्र शिरसाठ, सचिव अँड. भरत ठाकरे, खजिनदार दिपक शिरसाठ कार्यकारिणी सदस्य सुभाष ठाकरे, विनोद शिरसाठ, दिलीप शिरसाठ, नारायण नेरपगार, किशोर निकम, प्रभाकर नेरपगार, नामदेव चव्हाण, राकेश शिरसाठ, निलेश महाले (पत्रकार), राजेद्र महाले, सुर्यभान वाघ, काशिनाथ शिरसाठ, भगवान नेरपगार, भास्कर पवार, संदीप वाघ, नितीन शिरसाठ, विलास वेळीस्कार यांच्यासह सर्व समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. भरत ठाकरे यांनी केले.
Post a Comment