दीपक तरुण मंडळातर्फे यंदा अष्टभुजा स्वरूपातील श्री गणेश मूर्ती स्थापन करणार
जळगाव, [ प्रतिनिधी ]....दिनांक २० - जळगाव शहरातील रथ चौक येथील दीपक तरुण मंडळातर्फे यंदा बऱ्हाणपूर येथून अष्टभुजा स्वरूपातील ६ फुटी श्री गणेश मूर्ती विराजमान होणार आहे.
मंडळाचे यंदा 53 वे वर्ष आहे.
तसेच मंडळातर्फे यंदा सामाजिक विषयावर आरास साकारण्यात येणार आहे. मंडळाकडून यापूर्वी वेगवेगळ्या स्वरूपातील धार्मिक व सामाजिक आरास साकारण्यात आलेल्या आहेत. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे विसर्जन मिरवणूक मध्ये वेगवेगळ्या स्वरूपातील कसरती दाखवण्यात आलेल्या आहेत.
मंडळातर्फे वर्षभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात त्यामध्ये गावगुढीपूजन व वाहनाची पान सुपारी असे धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. मंडळाच्या कार्यालयामध्ये दररोज सकाळी अंगणवाडी वर्ग सुद्धा भरले जातात.
मंडळाच्या मीटिंगमध्ये गणेश उत्सव 2025 ची कार्यकारणी ठरविण्यात आली. कार्यकारणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष - मनीष वाणी
उपाध्यक्ष - पंकज शर्मा
खजिनदार - महेश भालेराव
सचिव - योगेश कासार
सदस्य - प्रमोद तांबट, ओंकार तांबट, दीपक ठाकूर, दीपक तांबट, मनोज सपकाळे, सागर शिंपी, कवी कासार, किरण शिंपी, प्रणव तांबट, कपिल कासार, तरुण शर्मा, कवी सपकाळे
सल्लागार - बालूमामा कासार, संजय जोशी, उमेश कासार, मुन्ना तांबट, सतीश वाणी, संजय वाणी, चंद्रकांत तांबट, संतोष तांबट, योगेश बोबडे,
Post a Comment