चर्मरोग अर्थात लंपीच्या आजाराने बाधित जनावरे दुर्दैवाने मेल्यास मोबदला मिळावा. पशुपालकांची मागणी.
अमळनेर [ प्रतिनिधी ]..गेल्या महिन्याभरापासून अंमळनेर तालुक्यात गोमाता व गोवंशानवर लंपी या चर्म रोगाचे संक्रमण व प्रादुर्भाव वाढला आहे. जनावरांच्या अंगावर पुरड उठतात काही दिवसानंतर त्याच्यातून रक्तस्राव होतो. जनावरांची अवस्था अत्यंत दयनीय होते. प्रसंगी काही वेळा जनावरे मृत्यू पावतात. अमळनेर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या चमुने(टीम ने) तालुका भर पशु वरील हा आजार वाढू नये म्हणून उपाययोजनांसाठी लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे. तरीसुद्धा काही गुरांनवरील हा आजार बळावत चालला आहे. परिणामी तालुक्याभरात काही गाई व बैल दगावले आहेत. या दुर्दैवी मृत्यू झालेल्या पशु मालका व शेतकऱ्यास त्यांची नोंदणी करून त्यांच्या मोबदल्यासाठी मागील वर्षा सारखे सरकार दरबारी पाठपुरावा करून त्यांना अनुदान मिळवून द्यावे अशी विनंती पशुपालकांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने मागील वर्षी लांपीच्या आजाराने मृत्यू झालेल्या जनावरांना नोंदी करूनपंचवीस हजार सरसकट मोबदला दिला होता. सध्या स्थितीतील मुख्यमंत्री यांनीही तो उपक्रम पुढे चालू ठेवावा अशी विनंती करण्यात आलेली आहे. पालन पोषण करून वाढवलेले जनावरे या चर्मरोगाने मृत्यू पावतात तेव्हा शेतकरी हवालदिल होतो. त्यांना खूप दुःख होते. त्या अनुषंगाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोबदल्यासाठी किंवा अनुदानासाठी प्रस्ताव पाठवावे असे नागरिकांचे मत आहे.
Post a Comment