तापी नदीला पूर आल्यामुळे पिण्याचे पाणी गढूळ येत आहे, पाणी उकळून व गाळून घ्या आरोग्याची काळजी घ्या ...मुख्याधिकाऱ्यांच्या सूचना.
अमळनेर [ प्रतिनिधी. ]... 16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट हवामान अंदाजानुसार सर्वदूर पाऊस सुरू आहे. तापी नदीच्या उगमस्थान व सर्व दूर पाऊस झाल्यामुळे नदीला पूर आला आहे. तापी नदी भरून वाहते आहे. त्याच नदीतून पिण्याच्या पाण्याची अमळनेर साठी उचल सुरू आहे. जास्त गडूळ पाण्याला निर्जंतुकीकरण करण्यासाठी उशीर लागतो. त्या अनुषंगाने पाणी गढूळ येते. सर्व नागरिकांना कळविण्यात येते की पिण्याचे पाणी चांगले गाळून व उकडून प्यावे अशा सूचना मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आहेत. तरी नागरिकांनी सतर्क रहावे. व आपल्यावर परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अशा आशियाचे पत्रक जाहीर केलेले आहे. या अशा वातावरणामुळे साथीचे रोग बळावण्याची दाट शक्यता असते. अनेक दवाखान्यांमध्ये सर्दी, खोकल्याचे उपचार घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होते आहे.
Post a Comment