गल्लीत गोंधळ, .... दिल्लीत.मुजरा...! ११ वी विद्यार्थ्यांना प्रवेश द्या .
जळगांव [ प्रतिनिधी. ] ..जिल्ह्यात ११ वी प्रवेशासाठी आँनलाईन अर्ज प्रवेश प्रक्रिया संपली आणि प्रवेशाचे सहा फे-या पार पडल्या, तरी देखील मिरीटचे विद्यार्थी आणि सहाव्या फेरी अखेर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या शिक्षणापासून वंचित राहतात की काय अशी भिती निर्माण झाली आहे,आलेले अर्ज आणि असलेल्या तुकड्या संख्या/ विद्यार्थी संख्या यांचा विचार केला तर बरेच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, सरकार मधिल पक्ष व त्यांचे नेते पक्ष प्रवेशासाठी दारोदार फिरत आहे पण मागेल त्याला शिक्षण देऊ असे शासन म्हणते आणि जागा नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात ह्या घटनेकडे अधिकारी व आमदार, मंत्री यांचे लक्ष नाही,असा आरोप शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांनी केला
म्हणून गल्लो गल्ली प्रवेशाचा गोंधळ सुरू असून दिल्लीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावपळ आहे,बिचा-या विद्यार्थ्यांकडे कोणाचे लक्ष नाही,
धरणगांव येथे ११ वी ज्युनिअर कालेजला अशीच परिस्थिती आहे. हे सर्व काल शिक्षण उपसंचालक राठोड साहेब नाशिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक चव्हाण मॅडम , सहाय्यक शिक्षणाधिकारी ईजाज शेख, प्रशासन अधिकारी प्रतिभा सुर्वे शिक्षण ,उपसंचालक नाशिक यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा करून लवकरच लवकर मार्ग काढावा यासाठी जळगांव येथे विद्यार्थ्यांचा व्यथा आणि कथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षा तर्फे शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांनी मांडल्या,या विषयात अधिकारी व शासनाने त्वरित मार्ग न काढल्यास विद्यार्थी युवासेनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, आणि होणा-या परीणामास जि प व शासन जबाबदार राहील असे सुचित करीत आहोत. यावेळी कुलभूषण पाटील,शरद तायडे, युवासेनानेचे विराज कावडीया,पियुष गांधी, निलेश चौधरी, विशाल वाणी,प्रमोद घगे, गुलाब कांबळे, योगेश चौधरी, योगेश पाटील, सचिन चौधरी,दिपक बडगुजर,किरण ठाकूर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment