डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या शेजारील अतिक्रमण तसेच बेकायदेशीर व्यवसाय बंद न केल्यास प्राणांतिक उपोषण करणार.. सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ सोनवणे..
अमळनेर [ प्रतिनिधी ]...गांधली पुरा पोलीस चौकी च्या समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य उभे स्मारक अर्थात पुतळा असून त्या स्मारकाच्या आजूबाजूला चौकात प्रशस्त जागा आहे. कोणतेही सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम सभा या चौकात होत असतात. अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या चौकातील अवैध धंदे आणि अतिक्रमण काढण्यासाठी निवेदने दिली आहेत. परंतु तेथील काही स्वयंघोषित नेते आणि पुढाऱ्यांच्या हस्तक्षेप आणि लुडबूडी मुळे आजपर्यंत ती अतिक्रमणे व बेकायदेशीर धंदे हटवले गेले नाहीत. पोलीस चौकीच्या समोर सट्टा मटका मटका, दारू दुकाने, सोरट, अशा बेकायदेशीर दुकानांचे रासरोस विक्री होणे कायद्याचे उल्लंघन आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर वरदळी मुळे व अस्वच्छते मुळे दयनीय स्थितीत आहे.
अमळनेर शहरातील समाज बांधवांसोबत सामाजिक कार्यकर्ते विशाल सोनवणे अतिक्रमण तसेच बेकायदेशीर धंदे त्या परिसरातून हटवण्यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. परिसरातील अतिक्रमण न निघाल्यास आमरण उपोषण करणार असे निवेदनात नमूद केलेले आहे. निवेदन देतेवेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment