ad headr

Powered by Blogger.

‘एक शाम देश के नाम’ देशभक्तीपर कार्यक्रमात पिंप्राळा झोनची बाजी



जळगाव –   [ प्रतिनिधी ].... स्वातंत्र्य दिनानिमित्त माहेश्वरी सभा, बालाजी पेठ, भवानी पेठ, बळीराम पेठ परिसर यांच्या वतीने “एक शाम देश के नाम” या भव्य देशभक्तीपर जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी आदित्य फार्म येथे करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे 1000 समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमात पाच ते दहा वयोगटासाठी तसेच 50 वर्षांवरील वयोगटासाठी फॅन्सी ड्रेस, समूहगीत गायन, जोडी नृत्य आणि समूहनृत्य या देशभक्तीवर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. जवळपास 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजेत्यांना ट्रॉफी व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आदित्य फार्म, निकम अँड लाठी असोसिएट्स व सुप्रीम इंडस्ट्रीज होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर माननीय नितीनजी लड्डा उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात शिव लाठी यांनी सांगितले की, हा कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून, प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत व्हावी हा उद्देश आहे. सूत्रसंचालन रूपाली लाहोटी आणि जयश्री लाठी यांनी केले.

या कार्यक्रमात पिंप्राळा झोन ने समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विशेष कौतुक मिळवले. अध्यक्ष मयूर सोमानी, सचिव वितेश भदादा, व सौ. वीणा सोमाणी यांनी या विजयासाठी परिश्रम घेतले. नृत्यासाठी अजय शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

पिंप्राळा झोनच्या विजयी स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

१) सपना अजमेरा

२) दीपिका अजमेरा

३) रिंकू मालिवाल

४) भाविका मानुधने 

५) श्वेता सोमानी

६) नेहा जाखेटे

७) नेहा झंवर

८) मयूर सोमानी

९) दर्शन अजमेरा- राजगुरु

१०) आयर्न अजमेरा- गांधीजी

११) नैतिक कोठारी- सुखदेव

१२) कैवल्य पोरवाल- भगतसिंग

१३) दर्शना जाखेटे- झाशीची राणी

१४) हंशिका झंवर- सुभाषचंद्र बोस



तसेच लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मन योगेश मालिवाल यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या आयोजनात प्रमोद झंवर, रमण लाहोटी, शिव लाठी, संतोष समदाणी, राधेश्याम सोमानी, योगिता दहाड, आनंद बिर्ला, सारिका मंडोरा यांचा मोलाचा वाटा होता.

No comments