धावत्या रेल्वेखाली सापडुन २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.... प्रतिनिधी भडगाव
कजगाव ते चाळीसगाव रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३४६ / ४ / ६ नजीक धावत्या रेल्वेखाली सापडुन एका २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलिस दुर क्षेत्राचे पोलिस हवालदार लक्ष्मण पवार हे जय मल्हार रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्यासह घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.
दुर्देश भानुदास महाजन (वय - २४ वर्ष) रा. कजगाव ता. भडगाव असे मृत तरुणाचे नाव असुन गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार भानुदास महाजन यांचा तो मोठा मुलगा होता. दुर्गेश महाजन याचे शिक्षण डी फार्मसी झाले आहे. शिक्षणानंतर दुर्गेश हा नाशिक येथे खाजगी कंपनीत नौकरीला होता. अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच दुर्गेश याचा विवाह झाला होता. दुर्गेश याचे मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पो. ह. लक्ष्मण पवार हे करीत आहेत. मयत दुर्गेश महाजन याचे पाश्चात्य आई, वडिल, एक लहान भाऊ असा परिवार आहे. अत्यंत मितभाषी व कष्टाळू दुर्गेश महाजन याच्या अकस्मात मृत्यूने कजगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment