सौ साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आमडदे या शाळेत आज किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषयक समुपदेशन कार्यक्रम संपन्न
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित सौ साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आमडदे या शाळेमध्ये आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी इयत्ता पाचवी ते बारावी या वर्गातील किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक समस्यांवर मार्गदर्शन व समुपदेशन शालेय स्तरावरील सखी सावित्री समिती अंतर्गत हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर आर वळखंडे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण हॉस्पिटल पाचोरा येथील संचालिका डॉ सौ अनुजा प्रवीण देशमुख मॅडम व विद्यालयाचे पर्यवेक्षक वाय एम देसले सर हे होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर आर वळखंडे सर यांनी केले त्यानंतर डॉ.अनुजा देशमुख मॅडम यांच्या कार्याचा परिचय श्रीमती उज्वला पाटील मॅडम यांनी करून दिला या कार्यक्रमांतर्गत मुलींच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या आरोग्य व आहार याविषयी सविस्तर माहिती व समुपदेशन डॉअनुजा देशमुख मॅडम यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुषमा पाटील मॅडम यांनी केले तर आभार श्रीमती कीर्ती पाटील मॅडम यांनी मानले या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विद्यालयातील जेष्ठ प्राध्यापिका श्रीमती ए पी पाटील मॅडम श्रीमती प्रिया पाटील मॅडम श्रीमती स्मिता पाटील मॅडम यांनी परिश्रम घेतले
Post a Comment