अमळनेर करांची मूलभूत सेवेसाठी किर किर.न.पा. प्रशासकाची आडमुठठी बेफि कीर ..
अमळनेर [ प्रतिनिधी ] . शहरातील असंख्य समस्या आ वासून उभ्या ठाकताना. मुख्याधिकारी मात्र एअर कंडीशन मध्ये निवांत. कोणी कितीही मोठी समस्या घेऊन आले तरी नुसते हो हो म्हणायचे आणि जैसे ते परिस्थिती .असा शीरस्ता चालू आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमण, नगरपालिका हद्दीतील
दुकानांच्या गाड्यांमध्ये अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट, अमळनेर मध्ये जागोजागी अस्वच्छता मोठे मोठे
कचऱ्याचे ढेर., पिण्याच्या पाण्याचा नियोजन शून्यतेचे पदोपदी दर्शन, शहरातील अंतर्गत रस्ते आणि गटारी अत्यंत दयनीय तथा किडस वाल्या अवस्थेत. डास मच्छरांमुळे रोगराईचा प्रादुर्भाव. अशा एक ना अनेक समस्यांनी अमळनेरकर त्रस्त आहेत परंतु नगरपालिका प्रशासनाला त्याचे काही घेणे देणे नाही ,असे दिसून येते. अनेक वेळा तक्रारी आणि निवेदनाचा नागरिकांकडून अक्षरशः पाऊस पडतो तरी मुख्याधिकारी वातानुकूलित कार्यालय सोडायला तयार नाहीत. अतिक्रमण चे पथक तसेच आरोग्य . पाणीपुरवठा , बांधकाम , आस्थापना
विभागात काही कर्मचारी हजर अर्धे अधिक गायप. अशी परिस्थिती नगरपालिकेची आहे. जणू काही कर्मचाऱ्यांवर मुख्य अधिकाऱ्यांचा वचक राहिला नाही असे सुज्ञ नागरिकांना शंका वाटते.अमळनेर शहरातील खुल्या भूखंडांवर घाणिचे, गवताचे
साम्राज्य आहे. त्यामुळे तेथे अनेक प्रकारचे मच्छर पहावयास मिळतात. फवारणी, धुरडणी ही काही ठिकाणी चालू आहे काही ठिकाणी बंद आहे. जणू काही श्रीमंत लोकांच्या कॉलनीमध्ये डेंगू चे मच्छर आढळतात
आणि गरीब नागरिकांच्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये, वस्तीमध्ये ती मच्छर अंडी घालत नाहीत. अशा अविर्भावात प्रशासन काम करते आहे.
🔴 स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची ऐसी तैसी.
🔴 स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची ऐसी तैसी.
नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होईल असे वागणे प्रशासनाला शोभत नाही, अशी नागरिकांची तीव्र भावना आहे.
Post a Comment