आरोग्य अधिकाऱ्याच्या ढिसाळ नियोजनाने अमळनेर करांचे आरोग्य धोक्यात... सगळीकडे अस्वच्छता कचऱ्याचे मोठे मोठे ढीग दृष्टीस पडतात ..आरोग्य यंत्रणा विस्कळीत.
अमळनेर( प्रतिनिधी )नगरपालिका कार्यक्षेत्रात येणारी आरोग्य यंत्रणा ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभार यामुळे अंमळनेरचे स्वच्छता वाऱ्यावर पडली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचे तसेच स्वच्छता निरीक्षकांचे दुर्लक्षामुळे व नगरपालिका कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्यामुळे, स्वच्छता यंत्रणा डबघाईला आलेली आहे. घंटा गाड्यांचे ठेकेदार व त्याचा नगरपालिकेमध्ये हस्तक्षेप यामुळे अमळनेर ची स्वच्छता अत्यंत किडस वाणी स्वरूपात आहे. मुख्याधिकारी यांचे प्रशासक म्हणून अत्यंत खेदजनक काम सुरू आहे. ते वातानुकूलित खोलीमध्ये बसतात सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या केबिनमध्ये जाण्यास बंदी आहे, मुख्याधिकारी साहेबांचा आरोग्य यंत्रणेवर दबाव नसल्याकारणाने अमळनेर मध्ये घाणीचे साम्राज्य आहे. सर्वसामान्य नागरिक मेटाकूटीस आलेला आहे. स्वच्छतेकडे जातीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
Post a Comment