वासरे गावाला पाण्याचा वेढा घरांमध्ये दोन दोन फूट पाणी शिरले.. नागरिकांनी सतर्क राहावे.
अमळनेर [ प्रतिनिधी ]..संपूर्ण पावसाळ्यात नव्हता एवढा पाऊस आज दिनांक 29 ऑगस्ट दुपारी चार ते सहा च्या दरम्यान बरसला. नदी, नाले, ओढे सर्व वाहू लागले शेतातून पाणी वाहून रस्त्यावर साचले. आजच्या पावसाने सर्वात जास्त पावसाची नोंद झाली. अजून सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी आपल्या गुराढोरांची व्यवस्था नदीपासून उंच जागेवर करावी. वासरे तालुका अमळनेर गावात पावसाच्या पाण्याचा वेढा पडला असून, घरांमध्ये पाणी साचले आहे.
जीवनावश्यक वस्तू जसे की धान्य, किराणा सर्व भिजून गेले आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून पंचनामा करून नागरिकांना नुकसान भरपाई साठी पावले उचलावीत अशी मागणी होते आहे.
Post a Comment