🔴🔴संजय गांधी निराधार योजनेचे मानधन गेल्या आठ दहा महिन्यांपासून बंद.. सरकारला निराधार महिलांची हाय लागेल... सामाजिक कार्यकर्ता प्रतिभा मनोज पाटील .🔴🔴
अमळनेर , [ प्रतिनिधी ] .... लाडकी बहीण योजनेचे मानधन सुरू असून संजय गांधी निराधार योजनेचे मानधन बंद आहे. याचाच अर्थ सरकारचे दुटप्पीपणाचे धोरण सुरू आहे. आठ ते दहा महिन्यापासून महिलांना मानधन नसल्यामुळे त्यांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या टेबलवर गेल्यानंतर अधिकाऱ्यांचे उडवा उडवी चे उत्तरे मिळतात. कधी म्हणतात तुमचा हयातीचा दाखला द्या. कधी म्हणतात तुमच्या पतीचा मृत्यू दाखला द्या, शाळा सोडल्याचा दाखला द्या, असे एक ना अनेक प्रश्न विचारून वेळ मारून नेत असतात. अनेक वेळा काम सोडून दिवसभर तहसील कार्यालयाच्या खेटा घालण्यामध्ये जातात. आमच्यासारख्या महिलांनी जगावं कसं. अशी केविलवाणी हाक मारणाऱ्या अनेक स्त्रिया तहसील कार्यालयाच्या खेटा घालताना दिसतात. या प्रश्नावर उद्विग्न झालेल्या स्त्रियांना घेऊन सामाजिक कार्यकर्ता प्रतिभा पाटील यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, खोट्या काही लाडक्या बहिणींचा नावाने लाखो रुपयाची उधळण सरकार करत आहे. तर दुसरीकडे खऱ्या गरजू विधवा महिला तसेच निराधार महिला यांचे हक्काचे मानधन सरकार देत नाही त्यामुळे सरकारला आमच्या विधवा व निराधार महिलांची हाय लागेल असे निवेदनात म्हटले आहे. विधवा, परीतक्ता, निराधार महिलांनी जगावे कसे अनेक वेळा आत्महत्याचा विचार डोक्यात येतो. तरी सरकारला आमच्याबद्दल काही एक कळवळा नाही. आशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.
Post a Comment