उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी यांचा साने नगर ,न्यू प्लॉट ,तांबेपुरा परिसरातील नागरिकांनी केला सत्कार..
अमळनेर (प्रतिनिधी).... एक ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी माननीय आप्पासाहेब महेंद्र पाटील तथा आप्पासाहेब मधुकर पाटील दोन्ही माजी सैनिक यांच्या उत्कृष्ट कर्तव्यातील कामगिरीबद्दल माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या ह्या कामगिरीबद्दल साने नगर ,न्यू प्लॉट तांबेपुरा परिसरातल्या नागरिकांनी उभयतांचा सत्कार ठेवला होता. शाल, श्रीफळ आणि बुके देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. असे कर्तव्यदक्ष महसूल अधिकारी शिस्तप्रिय माजी सैनिक यांच्यामुळे साने नगर , न्यू प्लॉट तांबेपुरा परिसरातील नागरिकांनी त्यांचा येथोचित सन्मान केला. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल व त्यांच्या जीवनातील संघर्षाबद्दल दादासाहेब महेश पाटील, विकी आबा पाटील प्रवीण दादा. पाटील (महाराज) यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या या केलेल्या कामगिरीचे नवीन पिढी प्रेरणा घेईल, त्यांच्या या कामगिरीमुळे आम्हा परिसरातील नागरिकांचा अभिमानाने ऊर भरून आला .त्या अनुषंगाने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा व सत्कार करताना महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान रावसाहेब आबा पाटील, हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील, पिंटू भाऊ पवार, कॉन्स्टेबल जे डी पाटील, विकास सोसायटी साने नगरचे माजी चेअरमन बंडू पाटील, भैय्यासाहेब पाटील लळावणकर, कृष्णा पाटील न्यू प्लॉट, सामाजिक कार्यकर्ता संदीप सैंदाणे, प्राध्यापक बाळासाहेब पाटील अंतुर्ली. इत्यादी अनेक परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Post a Comment