ad headr

Powered by Blogger.

शासनाच्या विविध योजनांबाबत प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी राज्यामध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबीराचे आयोजन.

भडगाव [ प्रतिनिधी ] सुभाष ठाकरे...
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता शेतकरी. विदद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी राज्यामध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबीराचे आयोजन करणेसंदर्भात मा. उपसचिव महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक/2025/प्र.क्र. 34/ई-8 दिनांक 25 मार्च 2025 नुसार आदेशित केलेले आहे. त्या अनुषंगाने आमडदे मंडळ भागात मा. श्रीमती शितल सोलाट, तहसिलदार भडगाव यांच्या उपस्थितीत सौ. साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विदयालय व ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात, आमडदे तालुका भडगाव येथे दिनांक 08/08/2025 रोजी सकाळी 12.00 वाजता वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. सदर शिबीरात तालुक्यातील तहसिल कार्यालयातील पुरवठा विभाग, सं.गा.यो. इं.गा.यो, श्रावणबाळ योजना, पंचायत समिती भडगाव, पोलीस स्टेशन भडगाव, महराष्ट्र विज वितराण कंपनी भडगाव, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग भडगाव, तालुका कृषी विभाग भडगाव, ग्रामीण रुग्णालय भडगाव, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय भडगाव, उपअधिक्षक भूमी अभिलेख भडगाव, सहायक निबंधक सहकारी संस्था भडगाव, पशुवैदयकिय अधिकारी भडगाव, दुय्यम निबंधक नोंदणी व मुद्रांक विभाग भडगाव, शिक्षण विभाग भडगाव, वनपरीक्षेत्र कार्यालय पाचोरा/चाळीसगाव इत्यादी विविध शासकिय कार्यालयामार्फत स्टॉल लावण्यात आले होते. शिबीरात सर्व संबंधित विभागातील शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. लाभार्थ्यांना स्तनदा माता योजनेअंतर्गत बेबी केयर किट, 7/12 उतारे, जातीचे दाखले, गुणवंत विदयार्थी, ईकेवायसी (नैसर्गिक आपत्ती अनुदान), अंत्योदय योजना लाभार्थी, संगायो/श्रावणबाळ योजना लाभार्थी, उत्पन्न दाखले, डोमीसाईल, अॅग्रीस्टॅक, नॉन क्रिमीलेयर दाखले व इतर लाभाचे वितरण मा. श्रीमती शितल सोलाट, तहसिलदार भडगाव यांचेहस्ते करण्यात आले. सदरच्या शिबीरास भडगाव तालुक्यातील व मंडळ भागातील नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती तसेच लाभ घेवून प्रतिसाद नोंदविला.

No comments