प्रताप' चा विद्यार्थ्याची पोलीस दलात निवड*-------------------------------------------------● सौरभ धनगर यांनी संघर्षातुन मिळविले प्रेरणादायी यश● करिअर कौंसेलिंग सेंटरचा विद्यार्थी● यापूर्वी SSC JD परीक्षा उत्तीर्ण● सौरभचे आई-वडील हात मजुरीचे काम करतात
अमळनेर : [|प्रतिनिधी ] दि. 8, येथिल प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटरचा विद्यार्थी सौरभ भास्कर धनगर (मु.पो.जैतपीर) यांची मुंबई पोलीस भरती (2022-23) अंतर्गत पोलीस उपायुक्त, मुंबई यांनी 06 ऑगस्ट 2025 रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध केले ज्या मध्ये अनु क्रमांक 161 वर सौरभ भास्कर धनगर यांचे नाव आहे.
सौरभ यांनी शारीरिक चाचणीत 44 गुण, लेखी परीक्षेत 89 गुण असे एकूण 133 गुण मिळविल्याने अंतिम यादीत स्थान प्राप्त केले आहे.
सौरभ यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युतर शिक्षण घेतले आहे आणि 2021 पासून तो करिअर कौंसेलिंग सेंटरचा नियमित विद्यार्थी होता.त्यांनी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात स्वातंत्र दिन निमित्ताने घेतलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावले होते.याचप्रमाणे सौरभने बेस्ट स्कॉलर प्रतापियन्स स्पर्धेत 6 वे क्रमांक मिळविले होते.त्याची स्पर्धात्मक जडणघडण झाल्यामुळे पोलीस भरतीत त्यांनी 133/150 गुण संपादन केले.
सौरभला भविष्यात व्हायचे मोठे अधिकारी,असे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तो परिश्रम घेणार आहे.
प्रस्तुत यशाचे श्रेय आई-वडील,गुरुजन यांना दिले आहे.या यशा बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन,चिटणीस प्रा पराग पाटील,डॉ.विजय तुंटे, डॉ.अमित पाटील, ग्रंथपाल दीपक पाटील,श्री.राकेश निळे,श्री.भटू चौधरी,डॉ.विलास गावित,डॉ.एस डी बागुल,डॉ.प्रदीप पवार,डॉ.हर्ष नेतकर,प्रा.हिमांशू गोसावी,प्रा.अमोल अहिरे,दिलीप शिरसाठ,पराग रविंद्र पाटील यांनी सत्कार व अभिनंदन केले आहे.
प्रस्तुत सत्कार प्रसंगी दितेश चिंचोरे,आकाश चिंचोरे,निखिल चौधरी,रोहित चौधरी,धिरज चौधरी, गौरव पाटील,प्रशांत पाटील,अखिलेश पाटील,हेमंत बडगुजर, हर्षल पाटील,इशांत पाटील,योगेश चिंचोरे,प्रशांत पाटील,नांदूसिंग पाटील,अतुल धनगर,विशाल अहिरे उपस्थित होते.
Post a Comment