ad headr

Powered by Blogger.

अमळनेर तालुक्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार बिन दिक्कत सुरू..

 
अमळनेर [ प्रतिनिधी ].. शहर व तालुका मिळून जवळ जवळ 90 ते 95 स्वस्त धान्य दुकाने आहेत. एका एका परवानावर दोन- दोन, चार- चार दुकानं सुरू आहेत. काही महा भागांचे तर आठ -आठ  स्वस्त धान्य दुकाने सुरू आहेत. दुकानदाराचे चलन भरून जेव्हा रेशन वाटपाला 
 सुरुवात होते. तेव्हा तांदूळ आणि गहू विक्री खरेदीला उधान येते. रिक्षाच्या, रिक्षा भरून स्वस्त धान्य विकले जाते. व्यापारी अगदी कमी किमतीत तांदूळ गहू सर्रास विकत घेतात. त्यानंतर खरा खेळ चालू होतो. नवीन  कोऱ्या करकरीत तीस -तीस किलोच्या गोण्यांमध्ये वेस्टन लावून तांदूळ गहू भरले जातात
 आणि वरून ऑटोमॅटिक शिलाई मशीनच्या द्वारे त्या गोण्या शिवल्या जातात. जणू काही मोठ्या मोठ्या कंपन्यांमधून गहू ,तांदूळ विक्रीला आला आहे अस भासवलं जातं. तदनंतर तालुक्यातून आणि शहरातून हा सगळा स्वस्त धान्य दुकानाचा माल एका प्रशस्त हजारो क्विंटल क्षमता असलेल्या गोडाऊनमध्ये जमा केला जातो. कमी किमतीत घेतलेलं धान्य चढ्या भावात विकीला पाठवला जातो. ट्रकाच्या  ट्रका भरून स्वस्त धान्य पसार केले जाते. हा सर्व प्रकार बेकायदेशीर असून. असे करताना आढळल्यास रेशन दुकानांची व विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करायचे सरकारी धोरण आहे. परंतु अशी एकही कारवाई अमळनेर तालुक्यात आणि शहरात झालेली नाही. याला सर्वस्वी जबाबदार यंत्रणा आहे. काही स्वस्त धान्य दुकानदारापासून तर अनेक व्यापारी या गोरख धंद्यामध्ये सामील असून हजारो क्विंटल स्वस्त धान्य गरिबाच्या घासातून हिसकावले जात आहे. हा सर्व काळाबाजार बंद व्हावा व या बेकायदेशीर कामांमध्ये जबाबदार असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उचलावा असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.

No comments